Share Market Latest Updates : आज शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्सनं (Sensex) सुमारे 400 अंकानी उसळी घेतली तर निफ्टीही (Nifty 50) 100 अंकांनी वधारला. सध्या सेन्सेक्स 52, 587 अंकांवर आहे. तर निफ्टी 15,664 अंकांवर व्यवहार करत आहे. बाजार सुरु होताच निफ्टी आणि सेन्सेक्सची घोडदौड सुरु झाली आहे. बाजारात सुरुवातीच्या सत्रात बँका आणि ऑटोच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 470 अंकांनी वाढला, निफ्टी 15700 वर
व्यवहार करत होता.


सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात निफ्टी 15,700 वर उघडला. सेन्सेक्स 1.01 टक्क्यांनी म्हणजेच 526.66 अंकांनी वाढून 52792.38 वर होता आणि निफ्टी 163.50 अंकांनी म्हणजेच 1.05 टक्क्यांनी वाढून 15720.20 वर होता. इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, विप्रो, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट यांची सेन्सेक्सवर घोडदौड पाहायला मिळाली. तर नेस्ले आणि एचडीएफसी यांचे शेअर घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील सकारात्मक होते निफ्टी बँक, फायनान्शिअल्स, खाजगी बँक आणि मीडिया यांना नफा झाला. ऑटो, आयटी आणि फार्मा यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली.


हिरो मोटोकॉर्प सर्वात कमाई करणारा शेअर


शेअर बाजाराच्या सुरुवातीला हिरो मोटोकॉर्पच्या शेअरनं सर्वाधिक उसळी घेतली. हिरो मोटोकॉर्पचा शेअर 2.83 टक्क्यांनी वाढला आहे. तर अपोलो हॉस्पिटलचा शेअर 1.16 टक्क्यांनी घसरला आहे. बँका आणि आयटी सेक्टरच्या शेअरचीही चांगली घोडदौड सुरु आहे.


आयटी आणि सॉफ्टवेअरच्या शेअर्सला 'अच्छे दिन'


जागतिक शेअर बाजारात आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या अधिक बोलबाला आहे. आजच्या बाजार बंद होताना अखेरीस आयटी आणि सॉफ्टवेअरचे शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 78.32 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयटी शेअर खरेदीच्या बाजूने गुंतवणूकदारांचं लक्ष असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या