Share Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. अमेरिकन शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. मात्र, त्यानंतर सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला असल्याचे दिसून आला.
शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये आज 245 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजार 55,218 अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टीमध्ये 66.10 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही किंचीत घसरण दिसून आली.
निफ्टीचा ट्रेंड कसा ?
शेअर बाजार सुरू होताच सुरुवातीच्या काही वेळेत निफ्टी 50 मधील 23 कंपन्यांचे शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 27 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीत 30.50 अंकांची घसरण दिसून आली.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 70 अंकांनी वधारला होता. निफ्टी 16,671 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 337 अंकांनी वधारत 55,801 अंकावर व्यवहार करत होता.
कोणत्या क्षेत्रात काय स्थिती?
बँक, ऑटो, एफएमसीजी, आयटी, ऑईल अॅण्ड गॅस, फायनान्शियल क्षेत्रात किंचीत घसरण दिसून आली. मात्र, ऑटो सेक्टरमध्ये मोठी घसरण दिसून आली. निफ्टीतील मेटल स्टॉकमध्ये 1.25 टक्क्यांची उसळण दिसून आली. मीडियातील शेअर्समध्ये 1.14 टक्क्यांची मोठी उसळण दिसून आली.
गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 1,300 अंकांपेक्षा अधिक वधारला, तर निफ्टी 16,700 च्या वर पोहोचला. 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत बाजाराला चार सत्रांमध्ये तीव्र घसरणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता गेले काही दिवस शेअर बाजारात उसळी पाहायला मिळली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Share Market : शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फायदा
- सेबीकडून 'त्या' 25 थकबाकीदारांची यादी जाहीर; वसुली अधिकाऱ्यांनाही सक्त आदेश
- पगारदार कर्मचाऱ्यांना 'या' गुंतवणुकीवर 2 लाखांहून अधिक कर सूट! जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha