Vasai Crime News : वसई पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अपहरण झालेल्या एका लहानगीची 24 तासात सुखरूप सुटका करण्यात आली. इतकंच नव्हे तर पोलिसांनी चार दिवसात आरोपपत्र दाखल केले आणि कोर्टाने आरोपीला शिक्षादेखील सुनावली. अपहरण झालेल्या मुलांची सुटका करणे आणि या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्याचा कालावधी बराच असतो. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेबाबत उदासीनता दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर वसईतील वाळीव पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरते.


घराबाहेर खेळणाऱ्या 6 वर्षाच्या मुलीला चॉकेलटचं अमिष दाखवून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी कंसा सिंह याने तिचं अपहरण केलं. ही घटना 4 मार्च रोजी घडली. वसईतील वाळीव पोलिसांनी रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करुन शोध मोहीम सुरू केली. परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कंसा सिंह या मुलीला घेवून जात असल्याच दिसलं. 


पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस मागावर असल्याचे कळताच अपहरण केलेल्या मुलीला मालाड येथेच सोडून आरोपीने पळ काढला. मालाडहून पोलिसांनी अपहरण झालेल्या लहान मुलीला ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुर्ला, दादर, बांद्रा या रेल्वे स्थानकावर शोधमोहिम सुरु केली. अखेर 6 मार्च रोजी आरोपी कंसा सिंहला पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानकातून अटक केली. वसई कोर्टाने आरोपीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.  


वाळीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस जयचंद ठाकूर आणि पोलीस उपनिरीक्षक सी.आर. पाटील यांनी ठोस पुरावे गोळा जमा करून कोर्टात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर कोर्टानेदेखील भारतीय दंड विधान कलम 363, 365 नुसार दोन वर्षांची कोठडी आणि 500 रुपयांचा दंड ठोठावला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha