Share Market Updates : मंगळवारीदेखील भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. रशिया आणि युक्रेनचे युद्ध आणि अमेरिकन शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये 422 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये 114 अंकांची घसरण झाली. 


आज शेअर बाजार सुरू झाला. सध्या स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील स्टॉकच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. तर, आयटी, फार्मा, ऊर्जा, रिअल इस्टेट, ऑइल आणि गॅस सेक्टरमधील  शेअर्सही वधारताना दिसत आहेत. बँकिंग, ऑटो आणि मेटल सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. आज सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 15 शेअर्स वधारले आहेत. तर, निफ्टीमधील 50 कंपन्यांपैकी 21 शेअर्सची घसरण झाली. पॉवर ग्रिडच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. सर्वात मोठी घसरण हिंदाल्कोच्या शेअरमध्ये दिसत आहे. सकाळी 10 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी 24 अंकांनी वधारला.   शेअर बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


 





गुंतवणूकदारांचे सोमवारी 6.32 लाख कोटींचे नुकसान


सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. युद्धामुळे लागलेल्या आगीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार होरपळले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे जवळपास 6.32 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 


जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला. सोमवारी गुंतवणूकदारांना 6,32, 530 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) सोमवारी 2,46,79,421.28 कोटी रुपये होते. बाजारातीस घसरणीमुळे बाजार भांडवल  2,40,46,891  लाख कोटी रुपये इतके झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांना 4 मार्च 2022 पर्यंत 7,631 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: