Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 600 अंकाहून अधिक घसरण दिसून आली आहे. निफ्टीदेखील 16950 अंकाखाली घसरला आहे. तर, सेन्सेक्स 57 हजार अंकाखाली  आला आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात याचे संकेत दिसून आले. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात झालेली घसरण आणि आशियाई बाजारात असलेले नकारात्मक संकेताचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. आज शेअर बाजाराची सुरुवात सेन्सेक्समध्ये 439.51 अंकाच्या घसरणी झाली. सेन्सेक्स 56757.64 अंकावर सुरू झाला. शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 57197 अंकावर बंद झाला होता. तर, निफ्टीमध्ये 162.9 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी 17009.05 अंकावर सुरू झाला. शुक्रवारी हा 17171 अंकावर बंद झाला होता.


शेअर बाजारात आज व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतरच्या काही मिनिटांवर निफ्टीतील 50 पैकी 45 शेअरमध्ये घसरण दिसून आली. फक्त 5 शेअरमध्ये तेजी दिसून येत होती. बँक निफ्टीमध्ये 146 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 35897 अंकांवर व्यवहार करत आहे. 


ऑटो क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक शेअर रिअल्टी क्षेत्रात दिसून येत आहे. मेटल क्षेत्रात 2.08 टक्के, आयटी क्षेत्रात 1.80 टक्के घसरण दिसून येत आहे. 


शुक्रवारी बाजाराची स्थिती काय होती?


शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 714 अंकांनी तर निफ्टीही 226 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,197 आणि निफ्टीमध्ये 1.27 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,172 वर पोहोचला. 


शुक्रवारी 1447 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1882 शेअर्समध्ये घसरण झाली. 115 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, रिअॅलिटी, बँक, आयटी, आरोग्य, फार्मा यासह जवळपास सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं.