मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस नुकसानीचा ठरला असून आज एकाच दिवसात शेअर बाजाराचं (Share Market Updates  Loss of four lakh crore rupees) चार लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. शेअर बाजारात आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 727 अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 206 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स आज 60,250 अंकांवर स्थिरावला तर निफ्टी आज 17,911 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला. 


Share Market Updates Loss of Four Lakh Crore Rupees: गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका


बाजाराच्या या घसरणीत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे चार लाख कोटींनी घटले. मंगळवारी बाजार बंद झाल्यावर बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 2,80,39,922.47 कोटी रुपये होते. तर आज तो 2,76,65,562.72 च्या जवळ असल्याचे दिसून येत आहे. इंट्रा डेमध्ये त्यात आणखी घसरण झाली. या संदर्भात आज गुंतवणूकदारांना चार लाख कोटींचा फटका बसला आहे. 


डॉलरच्या किंमतीत आज रुपयाच्या किमतीमध्ये 13 पैशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.59 इतकी आहे. सोमवारी ही किंमत 81.72 इतकी होती. 


जानेवारीच्या F&O ची मुदत संपल्याच्या दिवशी भारतीय बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात काहीशी गोंधळाची स्थिती असल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे बाजाराचा पॅटर्न राहत असल्याचं दिसून येतंय. निफ्टीने जानेवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात काहीशी चढ-उतार झाली. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मोठी घसरण झाली.


शेअर बाजारातील आजच्या घसरणीनंतर आता खरेदीची संधीही निर्माण झाली आहे. कारण अर्थसंकल्पानंतर मोठी तेजी दिसून आली. यावेळीही अर्थसंकल्पानंतर बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. आजच्या व्यवहारात बँक शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग होताना दिसत आहे. बँक निर्देशांक निफ्टीवर 2.32 टक्क्यांनी घसरला आहे. तर आर्थिक निर्देशांकात सुमारे 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टीवरील सार्वजनिक बँक निर्देशांक सुमारे चार टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी प्रायव्हेट बँकिंगमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. 


गेल्या वर्षीप्रमाणेच, या वर्षीही परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत परदेशी संस्थागत(FII) गुंतवणूकदारांनी 1.6 अब्ज डॉलर्सच्या शेअर्सची विक्री केली आहे. 


ही बातमी वाचा :