Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) किंचित उसळीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) 60700 पार, तर निफ्टी (Nifty) 18 हजारांवर पोहोचला आहे. भारतीय बाजारावर जागतिक बाजाराचा काही खास परिणाम दिसत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या अस्थिरतेला मंगळवारी बाजार बंद होताना लगाम लागला. मंगळवारी बाजार बंद होताना सकारात्मक चित्र दिसून आलं. परिणामी आज सुरुवातीच्या सत्रात बाजार तेजीसह उघडला.

  


शेअर बाजारात किंचित वाढीसह सुरुवात


आज शेअर बाजारात BSE सेन्सेक्स 60.31 अंकांच्या वाढीसह 60,716 वर उघडला आहे. तर, NSE चा निफ्टी 21 अंकांच्या किंचित वाढ म्हणजेच 0.12 टक्क्यांनी 18,074 वर उघडला. आज बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे.


शेअर बाजारातील सध्याची स्थिती


सध्या शेअर बाजार हळूहळू तेजीत येत आहेत. सेन्सेक्स सध्या 211.52 अंकांनी म्हणजेच 0.35 टक्क्यांनी वाढून 60867.24 वर पोहोचला आहे. निफ्टी 58 अंकांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांनी वाढून 18111.30 वर पोहोचला आहे.


आज कमाई करणारे शेअर्स


आज वाढत्या शेअर्समध्ये बँकांचे शेअर्स आहेत. आज सुरुवातीच्या सत्रात टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 1.80 टक्क्यांनी आणि एचडीएफसी बँक 1.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विप्रोमध्ये 1.16 टक्के आणि एचसीएल टेक 0.92 टक्क्यांनी उसळी घेतवी आहे. कोटक महिंद्रा बँक 0.88 टक्क्यांनी आणि एचडीएफसी 0.73 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. याशिवाय बजाज फायनान्स, टायटन, आयटीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि ॲक्सिस बँक या शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे.


शेअर बाजार तज्ज्ञ काय सांगतात? 


शेअर इंडियाचे व्हीपी डॉ. रवी सिंग यांनी सांगितले की, आज बाजार 18050-18100 च्या आसपास उघडल्यानंतर, दिवसभर व्यवहारात 17950-18150 च्या जवळपास राहण्याची अपेक्षा आहे. आज बाजारात तेजीसह व्यवहार होण्याचा अंदाज आहे. आज FMCG, ऊर्जा, रियल्टी, इन्फ्रा या सेक्टरमध्ये नफा होण्याची शक्यता आहे तर, PSU बँक, मीडिया आणि फार्मा या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Unemployment : 2023 वर्षात 20.8 कोटी जणांच्या नोकऱ्या जाणार, जगभरात नोकरकपातीचं संकट आणखी गडद; धक्कादायक अहवाल