Unemployment Rate Will Rise in 2023 : जगभरात 2023 मध्ये बेरोजगारांची संख्या आणखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (International Labour Organization) याबाबत एक अहवाल (ILO Report) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातील माहितीमुळे चिंता वाढली आहे. 2023 मध्ये जगभरात नोकरकपातीचं संकट अधिक दाट होणार आहे. 2022 वर्षात अनेक दिग्गज कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली होती. 2023 या नव्या वर्षातही नोकरकपातीचं सत्र सुरुच राहण्याचा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. कंपन्यांमधील नवीन भरतीची प्रक्रिया देखील संथ झाली आहे.


जागतीक मंदीचं (Recession) सावट अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना हटवले असून आणखी कंपन्या नोकरकपात करण्याच्या तयारीत आहेत. तसेच येत्या काळात जगभरातील कंपन्यांकडून नवीन भरती प्रक्रिया हळूहळू कमी करण्यात येईल. त्यामुळे जगभरात नोकरकपात वाढणार आहे. परिणामी बेरोजगारीही वाढणार आहे.


आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल काय सांगतो?


आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच इंटरनेशनल लेबर ऑर्गेनायजेशन (International Labour Organization) कडून जारी करण्यात आलेल्या अहवालात सांगितलं आहे की, "जागतिक रोजगार वाढीमध्ये संथपणा येण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये जागतिक रोजगाराचे प्रमाण फक्त 1 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. हे प्रमाण 2022 मध्ये 2 टक्के होते. जागतिक स्तरावर नोकरीचं संकट येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरु असलेले युद्ध आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारावर परिणाम होत आहे. परिणामी आर्थिक परिस्थिती कठीण होत चालली असून महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय आर्थिक धोरणंही अधिक कठोर करण्यात आली आहेत."


बेरोजगारांची संख्या वाढेल


आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ग्लोबल ट्रेंड्सवर प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, "2023 मध्ये जगातील एकूण बेरोजगारांची संख्या 30 लाखाने वाढून 20.8 कोटी दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचेल. महागाईमुळे नागरिकांच्या भत्त्यांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकांच्या उत्पन्नातही मोठी घट होणार आहे."


'नोकऱ्यांबाबत परिस्थिती भीतीदायक असेल'


रिचर्ड सॅमन्स, आयएलओ संशोधन विभागाचे समन्वयक आणि त्याच्या ताज्या प्रकाशित अहवालाचे म्हणणे आहे की, "कोविड संकटामुळे होणारे नुकसान 2025 पूर्वी उलटण्याची अपेक्षा नाही. जागतिक मंदी आणि जागतिक बेरोजगारी दराचे अंदाज हे स्पष्टपणे दर्शवत आहेत. याशिवाय येत्या काही वर्षांत अनौपचारिक नोकऱ्यांची स्थिती उलटण्याची शक्यताही आयएलओचा अहवाल देत आहे. ILO ने पूर्वी 2023 साठी रोजगार दर 1.5 टक्के असा अंदाज वर्तवला होता, परंतु ताज्या अहवालात तो 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, यावरुन परिस्थिती किती भीषण असू शकते हे दिसून येते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Layoffs in January : जानेवारीतही नोकरकपातीचा ट्रेण्ड, 15 दिवसांत गेला तब्बल 24 हजारांचा रोजगार