PAN-Aadhaar Link: आयकर विभाग (Income Tax Department) अनेकदा पॅनकार्ड (Pancard) संदर्भात नवी माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात वारंवार एकच गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे, पॅनकार्ड आधार कार्डाशी (Aadhar Card) लिंक करणं. आयकर विभागाने पुन्हा एक ट्वीट करत सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करुन दिली आहे. तसचे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्लाही आयकर विभागाने दिला आहे. 


आयकर विभागानं ट्वीटद्वारे केलं आवाहन 


आयकर विभागाने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ज्या पॅनकार्ड धारकांनी आपलं पॅन अद्याप आधारशी लिंक केलेलं नाही, त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं सांगितलं आहे. तसेच, आयकर विभागाने ट्वीट करत सर्वांना एक इशाराही दिला आहे. जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या संबंधित व्यक्तीचं पॅनकार्ड निष्क्रिय केलं जाईल, असा इशारा आयकर विभागानं दिला आहे. 


आपल्या ट्वीटमध्ये, आयकर विभागाने म्हटलं आहे की "आयकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारक जे Exempt Category मध्ये येत नाहीत, त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत त्यांचं पॅन आधारशी लिंक करावं. 1 एप्रिल 2023 पासून आधारशी लिंक न केलेले पॅनकार्ड निष्क्रिय होतील. ही एक तातडीची सूचना आहे, म्हणून उशीर करु नका, आजच लिंक करा!"






दरम्यान, आयकर विभागाचं हे ट्वीट अर्थ मंत्रालयानेही रिट्वीट केलं आहे.


सध्या पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी भरावा लागतोय दंड 


महत्त्वाची बाब म्हणजे, आयकर विभागाने लोकांना 31 मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्यास सांगितलं आहे. परंतु यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 1 जुलै 2022 ते मार्च 2023 दरम्यान पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. अशातच जर या मुदतीत तुम्ही दोन्ही लिंक न केल्यास तुमचं पॅनकार्ड अवैध किंवा रद्द होईल. 


पॅन, आधार कार्डसोबत (PAN Aadhaar Link) कसं लिंक कराल? 



  • आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.

  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

  • वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

  • यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

  • तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.


पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस


आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.


पॅन-आधार लिंक करण्यासाठी दंड भरण्याची प्रक्रिया



  • https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean वर क्लिक करा.

  • त्यानंतर Linking Request मध्ये CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.

  • त्यानंतर Tax Applicable पर्याय निवडा.

  • तुम्हाला 1 जुलै 2022 ते मार्च 2023 पर्यंत 500 रुपये दंड भरावा लागेल.

  • दंड भरण्याची पद्धत निवडा.

  • पुढे नेट बँकिंग प्रक्रिया (Net Banking Process) किंवा कार्ड मोडद्वारे पेमेंट करा.

  • पॅन क्रमांक आणि Assessment Year प्रविष्ट करा.

  • कॅप्चा प्रविष्ट करा.

  • तुम्ही Submit पर्यायावर क्लिक करताच पॅन आणि आधार लिंक होतील.