Share Market Opening : शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात आज घसरणीसह (Share Market ) सुरू झाली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) विक्रीचा जोर दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात विक्रीच्या परिणामी पडझड झाल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
आज, बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 175.45 अंकांच्या घसरणीसह 54,219.78 अंकांवर खुला झाला आहे. तर, निफ्टी 50 चा निर्देशांक निफ्टी 89.80 अंकांच्या घसरणीसह 16,126.20 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 241 अंकांच्या घसरणीसह 54,153.90 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 79 अंकांच्या घसरणीसह 16,136.90 अंकावर व्यवहार करत होता.
निफ्टी 50 पैकी 15 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून आले. तर, 35 शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
अपोलो रुग्णालयाच्या शेअर दरात जवळपास 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर दरात 0.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, विप्रोच्या शेअर दरात 0.64 टक्के आणि डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 0.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.64 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, टायटनच्या शेअर दरात 1.74 टक्क्यांनी घसरण झाली. बजाज फिनसर्व्हमध्ये 1.61 टक्के आणि जेएसडब्लू स्टीलमध्ये विक्रीचा जोर दिसत असून 1.56 टक्क्यांची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी सेन्सेक्समध्ये 86 अंकांची तर, निफ्टीमध्ये केवळ 4 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,395 अंकावर स्थिरावला. तर 0.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,216 अंकांवर स्थिरावला. सोमवारी शेअर बाजारात 2035 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1297 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 155 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: