Nandurbar Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy rains) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. काही ठिकाणचे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे.


नंदूरबार जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी अक्कलकुवा, धडगाव, नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नवापूर तालुक्यात 101.5 मिलिमीटर तर अक्कलकुवा 115.07 मिलिमीटर तर धडगाव तालुक्यात 101.06 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार शहादा आणि तळोदा तालुक्यात 45 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील 48 तासात रेड अलर्ट जारी करण्ात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्चवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे. तर जिल्ह्यातील 28 घरांची पडझड झाली आहे.




 
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस


मुसळधार पावसामुळं राज्यात काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम  या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: