Petrol-Diesel Price Today 12th July 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) -डिझेलचे नवे दर (Diesel Price) जाहीर केले आहेत. आजच्या नव्या दरांनुसार, देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 51 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे महागाईच्या गर्तेत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या दरांत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल रुपये स्वस्त होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


आजचे कच्च्या तेलाचे दर 


आंतरराष्ट्रीय बाजारातील आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर टाकली तर त्यात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड आज प्रति बॅरल 1.38 डॉलरनं घसरल्यानंतर प्रति बॅरल 102.7 डॉलरच्या दरावर आहे. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.21 डॉलरने घसरल्यानंतर प्रति बॅरल 105.9 डॉलरवर आहे.


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 


आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे. 


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?


देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंधन दर स्थिर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे.  


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).