Share Market News: जागतिक शेअर बाजारात दिसून आलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसला. आज, भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. आयटी (IT Sector) आणि बँकिंग सेक्टरमध्ये (Banking Sector) आज विक्रीचा सपाटा दिसून आला. बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 631.83 अंकांनी तर, निफ्टी निर्देशांक (Nifty)  176.35 अंकांनी घसरला. बाजारात आज झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात दोन लाख कोटींचे नुकसान झाले. 


शेअर बाजारातील व्यवहार किंचींत तेजीसह सुरू झाले. त्यानंतर बाजारात नफा वसुलीचा दबाव वाढू लागला होता. सेन्सेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे निर्देशांक 60,000 अंकांखाली घसरला होता. तर, निफ्टी निर्देशांकाने आज दिवसभरात 17,856 अंकांची निच्चांकी पातळी गाठली होती.


दोन लाख कोटींचा चुराडा


शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली. मुंबई शेअर बाजार सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले आहे. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल मंगळवारी 280.89 लाख कोटी रुपये इतके झाले. सोमवारी 9 जानेवारी रोजी, बीएसईचे बाजार भांडवल 282.99 लाख कोटी रुपये इतके झाले होते. आज बाजारात झालेल्या घसरणीमुळे बाजाराच्या भाग भांडवलात 2.10 लाख कोटींची घट झाली. 


सेन्सेक्समध्ये या शेअर्समध्ये दिसली तेजी


सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात आज तेजी दिसून आली. टाटा मोटर्सच्या शेअर दरात मोठी उसळण दिसून आली. टाटा मोटर्सच्या शेअर दरात 5.92 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, पॉवरग्रीड, टाटा स्टील, इंडसंइंड बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर दरात तेजी दिसून आली.


सेन्सेक्समधील या शेअर दरात घसरण


सेन्सेक्समधील 21 कंपन्यांचे शेअर दरात घसरण दिसून आली. भारती एअरटेलच्या दरात सर्वाधिक 2.92 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI),एचडीएफसी बँक (HDFC Bank), अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement), बजाज फायनान्स (Bajaj Finance) मध्ये घसरण दिसून आली. 


मुंबई शेअर बाजारात आज एकूण 3,654 कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,429 कंपन्यांचे शेअर्स वधारत बंद झाले. त्याच वेळी, 2,078 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 147 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या: