Share Market News:  शेअर बाजारात आजही नफावसुली झाल्याने घसरण दिसून आली आहे. मात्र, आज बाजार दिवसभरातील नीचांकावरून सावरला. सेन्सेक्स 480 अंकानी घसरला होता. तर, निफ्टी 140 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, त्यानंतर बाजार पुन्हा एकदा सावरला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 147 अंकांच्या घसरणीसह 59,958 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 17,858 अंकांवर बंद झाला. 

सेक्टोरियल इंडेक्सचे चित्र काय?

शेअर बाजारात आज आयटी, ऑटो, मीडिया सेक्टरमधील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तर, बँकिंग, एनर्जी, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थ केअर, ऑईल अॅण्ड गॅस, मेटल्स सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर दरातही घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 कंपन्यांच्या शेअर दरात  घसरण झाली. तर, 15 कंपन्यांचे शेअर वधारले. एनएसई निफ्टीमधील 50 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 24 कंपन्यांचे शेअर वधारले. 

इंडेक्‍स  किंती अंकांवर बंद झाला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 59,958.03 60,290.35 59,632.32 -0.25%
BSE SmallCap 28,795.33 28,945.89 28,690.61 -0.02%
India VIX 15.28 16.0425 14.42 -1.04%
NIFTY Midcap 100 31,360.10 31,566.50 31,236.70 -0.31%
NIFTY Smallcap 100 9,647.65 9,704.10 9,596.85 -0.07%
NIfty smallcap 50 4,327.10 4,351.30 4,302.65 -0.09%
Nifty 100 18,028.30 18,105.15 17,932.75 -0.14%
Nifty 200 9,443.55 9,484.90 9,395.30 -0.17%
Nifty 50 17,858.20 17,945.80 17,761.65 -0.21%

 

आज शेअर बाजारात दिवसभरातील व्यवहारात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 1.81 टक्के, एल अॅण्ड टीच्या शेअर दरात 1.66 टक्के, एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.62 टक्के, मारुती सुझुकीच्या शेअर दरात 1.08 टक्के, नेस्लेच्या शेअर दरात 0.74 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिलायन्सच्या शेअर दरात 2.11 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 1.54 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.40 टक्के, कोटक महिंद्राच्या शेअर दरात 1.26 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

बाजार भांडवल किती झाले?

आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल  279.93 लाख कोटी रुपये झाले. सूचीबद्ध असलेल्या 3652 कंपन्यांपैकी 1613 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1883 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 154 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.