Share Market Latest Updates : आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला आहे.  शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 685 अंकांनी वधारला तर निफ्टी 210 अंकांनी वर आला आहे. पाच दिवसांच्या पडझडीनंतर बाजार हिरव्या फितीत उघडला आहे. निफ्टीचा निर्देशांक पुन्हा 16 हजारांच्या पार गेला आहे. टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी पोर्ट, अपोलो रुग्णालय, सन फार्मासारख्या कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थिती उघडला आहे. काल रुपया 77.42 प्रति डॉलरवर बंद झाला होता आज तो 8 पैशाने वधारत रुपया 77.35 प्रति डॉलरवर उघडला आहे. तर कच्च्या तेलाच्या किंमती 107 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. 


आज मार्केटच्या सुरुवातीला बीएसईमध्ये सेंसेक्स 635.43 अंकांनी 1.20 टक्क्यांनी वर आला, जो 53,565.74 वर ओपन झाला आहे. बाजार सुरु झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांच्या आत निफ्टी 16,000 चा आकडा गाठला. 194.30 अंकांनी 1.24 टक्क्यांनी वर येत 16002 वर पोहोचला.   


काल बाजाराच्या सुरुवातीला सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आली होती. तर काल  शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1158 अंकांनी घसरला होता तर निफ्टीही 359 अंकानी घसरला होता. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 2.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,930 वर पोहोचला होता तर निफ्टीमध्ये 359 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,808 वर पोहोचला होता.


गुरुवारी शेअर बाजारात Adani Ports, IndusInd Bank, Tata Motors, Tata Steel आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली होती तर Wipro या एकमेव कंपनीच्या निफ्टीमध्ये वाढ झाली होती.


कालचा बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरसह सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 ते 4 टक्क्यांची घसरण झाली.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही - टक्क्यांची घसरण झाली होती.