Beed Farmers News : यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अद्यापही ऊस कारखान्याला गेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बीड जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणावर ऊस शेतात उभा आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जात नाहीत म्हणून ऊसाचा फड पेटवून देऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या शेतकऱ्याने कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने उसाच्या फडाला आग लागून पेटवून दिला आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचोटी अल्पभुधारक शेतकरी शिवाजी सुंदरराव गोंडे यांनी आपला ऊस फेटवून दिला आहे. मागील वर्षी तेलगाव येथील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता. मात्र, यावर्षी अनेकवेळा कारखान्याला खेटा मारल्या, मात्र यावेळी सध्या टोळ्या नाहीत तुमचा ऊस मालकतोड करुन कारखान्याला आणा, असे सांगण्यात आले. मालकतोड करायची म्हणजे ऊस तोडणीदार 1000 रु ते 1200 रु प्रति टन तोडणीला द्या म्हणू लागले. ड्रायवर 1 हजार रुपयांच्या एंट्री फी ची मागणी करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी अखेर उभ्या उसाला आग लावली आहे.
बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटवना बुधुवारी (11 मे) घडली होती. बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव आसाराम जाधव असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नामदेव जाधव यांना एकूण दोन एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊनदेखील रिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी मदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली. यामुळे नैश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यानंतर आता पुन्हा एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आहे.
या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरुन विविध शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तर हे ठाकरे सरकार नाही शेतकऱ्याला ठारं मारणारं सरकार असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या: