Share Market Latest Updates  : वर्षाच्या अखेरच्या महिन्यात भारतीय शेअर (Share Market News)बाजारात 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. शेअर बाजाराने (Share Market Live)नवीन निर्देशांक (sensex News update) गाठलेला प्रथमच पाहायाला मिळाला. त्याला कारण सुद्धा तसेच आहे.  विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफपीआयचा भारतीय शेअर बाजारावर मोठा विश्वास पाहायाला मिळतो आहे. कारण गेल्या महिन्यातही विदेशी गुंतवणूकदारांनी 36,200 कोटी रुपयांची खरेदी केली होती. 


डॉलर इंडेक्समध्ये घसरण होत असतानाही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांवरील निर्णयापूर्वीच्या मागील 4 सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या स्टॉकमधून 3,300 कोटी रुपये काढले आहेत.


नोव्हेंबरमध्येही एफपीआयने 36,239 कोटी रुपयांची खरेदी केली 


डिपॉझिटरी डेटाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 1 ते 9 दरम्यान,परदेशी गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये निव्वळ 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही त्यांनी 36,239 कोटी रुपयांची खरेदी केली होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शेअर्समधून 8 कोटी रुपये काढले होते. सप्टेंबरमध्येही त्यांनी 7624 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.


विक्रीचे कारण कदाचित फेडरल रिझर्व्हची आगामी बैठक 


गेल्या 4 सत्रांमध्ये एफपीआयच्या विक्रीचे कारण कदाचित फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीमुळे असेल. या वर्षासाठी फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) ची शेवटची बैठक 13-14 डिसेंबर रोजी होणार आहे असं रिसर्च, मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. 


कर्ज आणि रोखे बाजारात 1,637 कोटी रुपयांची गुंतवणूक


स्टॉक व्यतिरिक्त, एफपीआयने अहवाल कालावधीत कर्ज आणि रोखे बाजारात 2,467 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या महिन्यात फिलीपिन्स, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड आणि इंडोनेशिया यांसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही एफपीआय प्रवाह नकारात्मक राहिला आहे. नोव्हेंबरमध्येही त्यांनी 36,239 कोटी रुपयांची खरेदी केली होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शेअर्समधून 8 कोटी रुपये काढले होते. सप्टेंबरमध्येही त्यांनी 7624 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. एकंदरीतच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफपीआयचा भारतीय शेअर बाजारावर मोठा विश्वास पाहायाला मिळतो आहे. कारण गेल्या महिन्यातही विदेशी गुंतवणूकदारांनी 36,200 कोटी रुपयांची खरेदी केली होती. 


ही बातमी देखील वाचा