Dombivli crime Latest News Update: रस्त्यावर थुंकणे जीवावर बेतल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. पादचाऱ्याने बाईकस्वारावर थुंकल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. काही क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीतील राजू नगर परिसरात घडली. ही हाणामारीची घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात कैफ खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला करण्यात आली आहे. विजय पाटवा असे या मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.. 


डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरात काल दुपारच्या सुमारास विजय पाटवा हे दुचाकीने जात होते. याच वेळेस चालत जाणाऱ्या कैफ खान याने थुंकले. याच दरम्यान मागून दुचाकीने येणाऱ्या विजय पाटवा यांच्या अंगावर थुंकी उडाली. थुंकी अंगावर उडाल्याने विजय पाटवा यांनी कैफ याला जाब विचारला. कैफ याने विजय यांना शिवीगाळ करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे विजय देखील संतापले. दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या कैफ खान याने विजय यांना ठोशा बुक्क्यांनी तोंडावर बेदम मारहाण केली. यामुळे विजय हे खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने ते जागेवर बेशुद्ध झाले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरानी केले.


हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात कैफ खान विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. कैफ याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास विश्व नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे करत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हत्या झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांनी राजू नगर नवापाडा भागात कैफ खान हा पायी चालत होता. याच वेळी कैफ थुंकला व मागून बाईकने येणाऱ्या  विजय बटवा यांच्या अंगावर थुंकी उडाल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यातून शिवीगाळ होवून मारामारीत रूपांतर झालं. या मारामारीत विजय पाटवा यांचा मृत्यू झाल्याने कैफ विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करन्यात आली आहे. कैफ याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.