Share Market Investors Loss :  अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) बुडल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला. आज, सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरण दिसून आली. गेल्या तीन दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 2100 अंकांनी घसरला आहे. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 7.30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले (Share Market Investors Loss )आहे.


गुंतवणूकदारांचे 7.30 लाख कोटींचे नुकसान Share Market Investors Loss


तीन ट्रे़डिंग सेशनपूर्वी सेन्सेक्स 60,348 अंकांवर होता. आता सेन्सेक्स 2110 अंकांच्या घसरणीसह 58,237 अंकांवर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी तीन दिवसांपूर्वी 17,754 अंकांवर होता. आता, त्यात 600 अंकांची घसरण झाली असून 17,154 अंकांवर आला आहे. मात्र, या तीन दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आज,  सोमवारीच (13 मार्च 2023) गुंतवणूकदारांचे 4.38 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, तीन ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांचे 7.30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन ट्रेडिंग सेशनमध्ये मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) 265.86 लाख कोटी होते.  आता, तीन दिवसांनंतर बाजार भांडवल 258.56 लाख कोटींवर आले आहे.


बाजारात घसरण का सुरू?


अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक संकटाचा सर्वाधिक परिणाम झाला असल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकन नियामकांच्या हस्तक्षेपानंतरही ही घसरण दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून येत असेल तर त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवरही दिसून येतो. अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसत असून आता मंदीची भीतीदेखील व्यक्त होत आहे. 


व्याज दरवाढीची भीती 


फेब्रुवारी महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दरात थोडीशी घसरण झाली आहे. महागाईचा दर 6.44 टक्क्यांवर आला आहे. मात्र, हा दर रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या 6 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिकच आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्ज महाग होण्याची शक्यता आहे. त्याचे सावटही भारतीय शेअर बाजारावर दिसून आले आहे. त्यामुळे 22 मार्च रोजी यूएस फेडरल देखील व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यानंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याच्या प्रक्रियेत काही काळ थांबू शकते, असे अनेक बाजार तज्ज्ञांचे मत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: