Border Gavaskar Trophy :  भारत आणि ऑस्ट्रेलिया  (IND vs AUS) यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (BGT 2023) स्पर्धेत भारतानं पुन्हा एकदा विजय मिळवला. भारतीय संघानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय संघाने ही ट्रॉफी सलग चौथ्यांदा जिंकली. यावेळची ट्रॉफी खूपच रोमांचक होती. पहिल्या तीन सामन्यांमध्ये फिरकी खेळपट्ट्या पाहायला मिळाल्या. त्याच वेळी, अखेरच्या सामन्यात खेळपट्टीवर फलंदाजाची हवा दिसली. या ट्रॉफीमध्ये आर अश्विनने सर्वाधिक 25 विकेट घेतल्या आणि उस्मान ख्वाजाने 333 धावा केल्या. तर यंदाच्या ट्रॉफीसंबधी काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स जाणून घेऊ...



  1. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 4 सामन्यांच्या 7 डावात 47.57 च्या सरासरीने एकूण 333 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली.

  2. या ट्रॉफीमध्ये भारताचा फिरकीपटू आर अश्विनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 4 सामन्यांच्या 8 डावात 17.28 च्या सरासरीने 25 बळी घेतले.

  3. या मालिकेत विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 15 चौकारांच्या मदतीने 186 धावांची खेळी केली.

  4. या मालिकेत अक्षर पटेलने एका डावात सर्वाधिक षटकार ठोकले. त्याने एका डावात सर्वाधिक 4 षटकार मारले होते.

  5. उस्मान ख्वाजाने एका डावात चौकार आणि षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 86 धावा केल्या. ख्वाजाने आपल्या खेळीत एकूण 21 चौकार मारले.

  6. एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायन अव्वल स्थानावर आहे. त्याने एका डावात 8 विकेट घेतल्या

  7. एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही नॅथन लायनच्या नावावर होता. त्याने एका सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या.

  8. विकेटच्या मागून केएस भरतने सर्वाधिक 8 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

  9. या मालिकेत क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीने सर्वाधिक 5 झेल घेतले.

  10. या मालिकेत उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात 208 धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली. दोघांमधील ही भागीदारी पाचव्या विकेटसाठी झाली.


अखेरचा सामना अनिर्णीत


सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत तब्बल 480 धावा स्कोरबोर्डवर लावल्यावर भारतानं चोख प्रत्यूत्तर देत शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या शतकाच्या मदतीनं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ज्यानतंर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 175 धावा केल्यावर दिवसाचा खेळ संपला ज्यामुळे कसोटी सामना अनिर्णीत राहिला.


हे देखील वाचा-