Share Market Updates : मुंबई : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2024) आज शेअर बाजार (Stock Market) सुसाट असल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजारानं आज नवा विक्रम रचला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या सेन्सेक्सनं मोठी झेप घेतली आहे. आज सेन्सेक्सनं पहिल्यांदाच 75,000 चा टप्पा पार केला. सेन्सेक्ससोबतच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टी निर्देशांकही रॉकेटच्या वेगानं धावला आणि 22,700 च्या नव्या शिखरावर पोहोचला आहे. 


शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स सुसाट 


मंगळवारी ग्लोबल शेअर मार्केटमधील तेजीनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनंही मोठी झेप घेतल्याचं पाहायला मिळालं. BSE सेन्सेक्सनं सकाळी 9.15 वाजता पहिल्यांदा 75000 चा टप्पा ओलांडला असून सेन्सेक्स 75,124.28 वर उघडला. आतापर्यंतची सेन्सेक्सची ही सर्वात मोठी झेप असल्याचं बोललं जात आहे. काल (सोमवारी) BSE Sensex 74,742.50 वर बंद झाला होता. आज सकाळच्या सत्रात NSE Nifty ही सेन्सेक्सच्या बरोबरीनं व्यवहार करत होता. निफ्टीनंही आज विक्रमाचं नवं शिखर गाठल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीनं 22,765.10 च्या विक्रमी पातळीवर व्यापार सुरू केला, NSE चा हा निर्देशांक मागील व्यवहाराच्या दिवशी 22,666.30 च्या पातळीवर बंद झाला होता.


1662 शेअर्सची घोडदौड


शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीसह, 1,662 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 584 शेअर्सची सुरुवात घसरणीनं झाली. 97 शेअर्सच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही. जर आपण सेन्सेक्सबद्दल बोललो तर, सुरुवातीची गती कायम राहिली आहे आणि 15 मिनिटांच्या व्यापारानंतर, हा निर्देशांक त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून थोडासा घसरले 281.85 अंकांच्या किंवा 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 75,024.35 च्या पातळीवर व्यापार करत आहे. 


इन्फोसिसपासून टाटापर्यंतचे शेअर्स जोमात 


सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये, गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्स बीएसईवर 5.85 टक्के किंवा 151 रुपयांच्या वाढीसह 2,739.40 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय इन्फोसिसचा शेअर 2.09 टक्क्यांनी वाढून 1508 रुपयांवर पोहोचला. इतर वाढत्या शेअर्समध्ये, टाटा स्टील (1.21 टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजीज (1.05 टक्के), एक्साइड इंडस्ट्रीज (2.31 टक्के) आणि टाटा ग्रुप कंपनी व्होल्टास 1.91 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.


(वरील माहिती केवळ माहिती म्हणून वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही, त्यामुळे शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुम्हीही कोणतीही गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच करावी असं आवाहन ABP माझा करतंय.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gudi Padwa Gold Price: गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा भाव 73400, उद्या सकाळपर्यंत सोनं 75 हजाराचा टप्पा गाठणार?