मुंबई : भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह खुला झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 300 अंकांनी घसरला. अमेरिकेनं मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्व्हनं 2025 मध्ये व्याज दरातील कपातीच्या संख्येत घट केल्यानं अमेरिकन स्टॉक एक्सचेंज देखील घसरला. त्याचा परिणाम भारतात देखील पाहायला मिळाला. सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरुन  80 हजारांच्या खाली घसरला. सेन्सेक्स 79237 अंकांवर  पोहोचला आहे. दुसरीकडे निफ्टी  90 अंकांनी घसरुन  23907 अंकांवर पोहोचली आहे. 


सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी  28 कंपन्यांचे शेअर घसरले. 2 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती. निफ्टीवर 50 कंपन्यांपैकी 47 कंपन्यांचे शेअर घसरले केवळ  3 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. इन्फोसिस 2.49 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 2.14 टक्के, एचसीएल टेक 1.93 टक्के, टेक महिंद्रा 1.85 टक्के, बजाज फिनसर्व 1.67 टक्के, टाटा स्टील 2.01टक्के घसरण झाली. केवळ एचयूएल आणि आईटीसीच्या शेअरमधये तेजी पाहायला मिळाली. बीएसईवरील 3306 शेअर 841 शेअरमध्ये तेजी आहे तर 2354 शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.  


शेअर बाजारातील घसरणीच्या कारणामुळं सकाळच्या सत्रातच गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपये बुडाले. बीएसईचं मार्केट कॅप 452.6 लाख कोटींवरुन 449.34 लाख कोटीवर आलं आहे. 


आजच्या सत्रात बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, ऑइल अँड गॅस या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांचे शेअर तेजीत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 


अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं 2025 केवळ दर कपातीबाबत भाष्य केल्यानं अमेरिकेसह जगभरातील बाजारात घसरण पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.  दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आहे. रुपया कमोजर झाला असून एका डॉलर साठी भारताला 85 रुपये द्यावे लागतील.


दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात घडलेल्या घडामोडींमुळं गुंतवणूकदारांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.    


इतर बातम्या :


EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)