Share Market Closing Bell : आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) चांगली तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील (Banking And IT Sector )स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजारात तेजी दिसली. आज शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 659 अंकांनी वधारून 59,688 अंकावर बंद झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 174 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांक 17,798 अंकांवर बंद झाला.
बँक निफ्टीमध्ये आज चांगलेच तेजीचे वातावरण होते. बँक निफ्टीतील 12 पैकी 11 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर उर्वरित एका शेअरमध्ये घसरण झाली. बँकिंगशिवाय, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. तर, मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, फार्मा, मीडिया सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही तेजी दिसून आली.
निफ्टी 50 मधील 37 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 13 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 5 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
टेक महिंद्राचे शेअर दर 3.23 टक्क्यांनी वधारले. अॅक्सिस बँकमध्ये 3.22, आयसीआयसीआय बँक 2.57 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2.48 टक्के, भारती एअरटेलच्या शेअरमध्ये 2.28 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 2.26 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटच्या दरात 2.22 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.91 टक्क्यांनी वधारले.
टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.63 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 0.33 टक्के, टायटन कंपनीच्या शेअर दरात 0.32 टक्क्यांनी घसरण दिसून आली.
आज सकाळपासून शेअर बाजारात खरेदीचा जोर राहण्याचे संकेत दिसून आले होते. आज शेअर बाजारातील (Share Market) व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. फार्मा, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी शेअर दर वधारले होते. बाजार उघडताच निफ्टीने (Nifty) 17750 अंकांची पातळी ओलांडली. तर, सेन्सेक्सने (Sensex) 59400 अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्स 346.08 अंकांनी वधारत 59,374.99 अंकावर खुला झाला होता. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 123.75 अंकांनी वधारत 17,748 अंकांवर खुला झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या: