RERA GIVES RELIEF TO HOME BUYERS AFTER BOOKING CANCELLATION : घर बुक केल्यानंतर कोणत्याही समस्येमुळे ते रद्द झाल्यास बिल्डर घर खरेदीदारांकडून जास्त रक्कम घेऊ शकणार नाहीत. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (रेरा) (Maharashtra Rera) सर्व बांधकाम व्यावसायिकांना या संदर्भात आदेशही जारी केले आहेत.
महाराष्ट्र रेरानुसार, (Maharashtra Rera) आता घरांचे बुकिंग (home booking ) रद्द केल्यावर खरेदीदाराला एकूण किमतीच्या फक्त 2 टक्के रक्कम बिल्डरला द्यावी लागेल. आतापर्यंत ही रक्कम 10 टक्के होती. यामुळे स्वाभाविकच घर खरेदीदारांना मोठा दिलासा असणार आहे. कल्पतरू अवाना या लक्झरी रिअल इस्टेट प्रकल्पाच्या विकासकांना दिलेल्या आदेशात, रेराने (Maharashtra Rera) याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत. हे आदेश देताना रेराने (Maharashtra Rera) घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील करारामध्ये बुकिंग रद्द करण्याच्या बाबतीत 10 टक्के रक्कम आकारणे पूर्णपणे अवास्तव असल्याचं म्हटलं आहे.
प्रकल्पाच्या दिरंगाईनंतर वाद सुरू -
महाराष्ट्र रेरामध्ये (Maharashtra Rera) ऑगस्ट 2020 मध्ये घर खरेदीदारांनी तक्रार केली आणि त्यांचे पैसे व्याजासह परत करण्याची मागणी केली. त्यांनी कोणत्याही विक्री आणि खरेदी दस्तऐवजांवर स्वाक्षरी केलेली नाही, परंतु 2015 मध्ये एलओआयवर स्वाक्षरी केली होती जे एक वाटप पत्र होते. या पत्रात फ्लॅट मिळण्याच्या तारखेचा उल्लेख नव्हता, मात्र त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी पुरेसा असल्याचे घर खरेदीदारांनी सांगितले. घर खरेदीदारांनी जुलै 2020 मध्येच प्राधिकरणाला कळवले होते की, त्यांना या प्रकल्पात रस नाही आणि ते यातून माघार घेऊ इच्छित आहेत. यासोबतच विकासकांना दिलेले पैसेही त्यांना व्याजासह परत हवे आहेत. मात्र, विकासकांना ऑक्टोबर 2021 मध्ये या सदनिकांचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले.
विकासक काय दावा करतात? -
प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, कल्पतरू डेव्हलपर्सने अनेक तक्रारी देखील केल्या, ज्यात घर खरेदीदारांनी विक्री-खरेदी करारावर स्वाक्षरी करून उर्वरित रक्कम व्याजासह देण्याची मागणी केली. पण, रेराने विकासकांचा युक्तिवाद स्वीकारला नाही. घर खरेदीदारांनी त्यांचे बुकिंग रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. ग्राहकांच्या तक्रारीनंतर विकासकांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीदारांना (home booking ) प्रकल्पात राहण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच, विकासक घराच्या एकूण किंमतीपैकी फक्त 2 % कास्ट चार्ज म्हणून वजा करू शकतात असं सांगितलं होतं.