Share Market Closing Bell:  भारतीय शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव दिसून आला आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारात घसरण दिसली आहे. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात किंचीत घसरण झाली आहे. तर, दुसरीकडे संपूर्ण बाजारात पडझड दिसून आले. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 40 अंकांच्या घसरणीसह 57,613 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंकांच्या घसरणीसह 16,951 अंकांवर स्थिरावला आहे. 

आजच्या व्यवहारात फक्त बँकिंग सेक्टरमधील शेअर्स वधारले आहेत. तर आयटी, ऑटो, मेटल, एनर्जी, एफएमसीजी, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्स दरात घट झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. निफ्टीतील 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, 32 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 11 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर 19 समभाग घसरणीसह बंद झाले. आज बाजारात एकूण 3644 शेअर्सचे व्यवहार झाले. त्यापैकी 2500 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह आणि 1045 शेअर्स तोट्यासह बंद झाले.

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावलादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex57,643.2357,949.4557,494.91-0.02%
BSE SmallCap26,162.8226,417.2126,120.32-0.77%
India VIX15.115.607514.865-2.23%
NIFTY Midcap 10029,324.7529,516.8029,200.20-0.35%
NIFTY Smallcap 1008,701.408,801.558,682.00-0.91%
NIfty smallcap 503,993.754,029.953,984.65-0.74%
Nifty 10016,795.3516,905.3016,758.10-0.32%
Nifty 2008,802.058,855.508,780.35-0.32%
Nifty 5016,951.7017,061.7516,913.75-0.20%

कोणत्या स्टॉक्समध्ये तेजी?

आज दिवसभरातील व्यवहारात इंडसइंड बँक 2.13 टक्क्यांनी, पॉवरग्रीड 1.20 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 1.06 टक्क्यांनी वधारला. एनटीपीसी 0.61 टक्क्यांनी, रिलायन्स 0.47 टक्क्यांनी, टाटा स्टील 0.20 टक्क्यांनी वधारत स्थिरावले. तर, टेक महिंद्रा 2.90 टक्क्यांनी घसरला. त्याशिवाय, टाटा मोटर्स 2.29 टक्क्यांनी, भारती एअरटेल 1.94 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

स्मॉल कॅप किंवा मिड कॅप शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 252 लाख कोटी रुपयांवर आले आहे. हे मार्केट कॅप सोमवारी 253.51 लाख कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांना 1.51 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या: