Tips To Control Emotions: लोकांची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही लोकांना पटकन राग येतो तर काही लोक लगेच इमोशनल होतात. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनेक समस्या आपोआप सुटतात. जर तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नसेल,  तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता.


एक्सरसाईज करा (Exercises)


एक्सरसाईज हे स्ट्रेस बस्टर आहे, असं मानलं जातं. व्ययाम केल्यानं तुम्ही भावनांवर नियंत्रण आणू शकता. तसेच जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि भावना व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही गाणी ऐका, डान्स करा आदी गोष्टी करु शकता. योगा करणं देखील फायद्याचं ठरेल. योगा केल्यानं केवळ शरीर नाही तर मन देखील निरोगी राहते, असं देखील म्हटलं जातं. शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंटल हेल्थकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. 


मेडिटेशन करा (Meditation)


इमोशन्सवर कंट्रोल आणायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन करताना माणूस सगळे विचार विसरुन एकाग्र होतो. 


स्वत:बद्दल विचार करा


जर तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायचे असेल तर इतरांच्या भावनांच्या आधी स्वत:च्या भावनांचा आदर करा. स्वत:च्या भावना समजून घ्या. कोणत्या सवयींमुळे तुम्हाला त्रास होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या सवयी सोडण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही स्वत:च्या भावनांवर नियंत्रण आणू शकता. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींबद्दल बोलणे टाळतो. इतरांचा विचार करु नका, प्रत्येक गोष्टीबद्दल मोकळेपणानं बोला. त्यामुळे तुम्ही भावनांवर नियंत्रण आणू शकता. 


शांत मनाने विचार केल्यानं तुम्ही एखाद्या समस्येकडे वेगळ्या पद्धतीने बघता. अशा परिस्थितीत त्या समस्या सोडवणे सोपे जाते. त्यामुळे तुमच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. हे तुम्हाला खूप चांगले वाटेल.


आर्थिक अडचणी, कामाचा स्ट्रेस या गोष्टींमुळे अनेकांमध्ये तणाव निर्माण होतो. त्यामुळे तुमचा भावनांवर कंट्रोल राहत नाही. अशा वेळी या टिप्स फॉलो करणं फायदेशीर ठरेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :


Tips To Prevent Hair Fall: चुकूनही ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळू नका! होऊ शकतात 'या' समस्या