Stock Market Closing Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पडझडीनंतर शेअर बाजार सावरला आहे.  मोठ्या अस्थिर वातावरणात बॅंक, आॅटो, आॅइल ॲंड गॅस आणि मेटलच्या शेअर्सच्या तेजीमुळे आज ग्रीन रंगात शेअर बाजार बंद झाला आहे. सेन्सेक्स 231 अंकांनी वधारुन निर्देशांक 57 हजार 593 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 69 अंकांनी वधारुन निर्देशांक 17, 222 वर बंद झाला आहे. 


आज आयटी क्षेत्र, फार्मा क्षेत्र, आरोग्यसेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रामध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळालं. याशिवाय निफ्टी ऑइल अँड गॅस, रियल्टी, प्रायव्हेट बँक, पीएसयू बँक, मेटल, मीडिया, एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ऑटो आणि बँक निफ्टी सेक्टरमध्ये दिवसभर चांगली वृद्धी पाहायला मिळाली. 


सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्सच्या यादीत 11 शेअर्स लाल चिन्हातवर बंद झाले आहेत. याशिवाय 19 शेअर्सची चांगली विक्री झाली आहे. आज नेस्ले इंडियाच्या शेअर्सची सर्वाधिक विक्री झाली आहे. याशिवाय, एचडीएफसी, एचसीएल टेक, टीसीएस, एनटीपीसी, एलटी, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, एशियन पेंट्स, डॉ रेड्डी हे सर्व शेअर्स लाल चिन्हावर बंद झाले आहेत. तसेच भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एसबीआय, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, एचयूएल, मारुती, रिलायन्स, टायटन, सन फार्मा, बजाज फायनान्स, कोटक बँक या शेअर्समध्ये देखील वृद्धी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.   


दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 223 अंकांनी, तर निफ्टीही 69 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.41 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,362 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,153 वर पोहोचला होता.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Stock Market: हफ्ते के पहले दिन बाजार में रही तेजी, सेंसेक्स 231 अंक चढ़कर बंद, निफ्टी 17200 के पार निकला


Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर