Business News : बँकांचे व्यवहार  (Transactions of banks) करण्याऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता परदेशात पैसे पाठवणं (sending money) महाग झालं आहे. काही महत्वाच्या बँकांनी परदेशात पैसे पाठवण्यासाठी आपापल्या शुल्कात वाढ केली आहे. दरवर्षी भारताततून (India) शिक्षणासाठी (Education) मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात. तसेच उद्योग व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने देखील काही लोक परदेशात जातात. अशा स्थितीत तुम्हाला तर परदेशात मुला मुलींना किंवा तुमच्या नातेवाईकांना पैसे पाठवायचे असतील त्यासाठी बँका शुल्क आकारतात. काही बँकांनी आता शुल्कात वाढ केलीय, पाहुयात त्या संदर्भातील माहिती. 


भारतातून दरवर्षी  वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात. तसेच अनेक लोकही उद्योग व्यवसायानिमित्त परदेशात जातात. अशा लोकांना पैसे पाठवण महाग झालं आहे. कारण देशातील एसबीआय (SBI), एचडीएफसी (HDFC) आणि ॲक्सिससह (Axis) या महत्वाच्या बँकांनी परदेशात पैसे पाठवण्याच्या शुल्कात वाढ केलीय. त्यामुळं परदेशात अचानक पैशांची गरज पडणाऱ्या लोकांना पैसे पाठवणं महाग झालंय. 


नागरिकांच्या खिशाला अतिरीक्त झळ बसणार


परदेशात मुला मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले जातत. मात्र, काही बँकांनी परदेशात पैसे पाठवण्याच्या शुल्कात वाढ केलीय. त्यामुळं आता नागरिकांच्या खिशाला अतिरीक्त झळ बसणार आहे. भारतातून परदेशात पैसे पाठवण्यासाठी केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 'लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम' (LRS) ही योजना चालवते. या योजनेंतर्गत एक भारतीय शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी वर्षभरात भारतातून 2.5 लाख डॉलर्स परदेशात पाठवू शकतो. आतापर्यंत अनेक बँकांनी ही रक्कम पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. आता बहुतांश बँकांनी त्यात वाढ केली आहे.


कोणत्या बँकेनं किती शुल्क आकारलं? 


एचडीएफसी बँक (HDFC)


परदेशात पैसे पाठवताना बँका काही शुल्क आकारातात. शुल्कात एचडीएफसी बँकेने देखील वाढ केलीय. तुम्ही भारतातून जर 500 डॉलर किंवा त्याच्या समतुल्य पैसे परदेशात पाठवले तर तुम्हाला HDFC बँकेतील प्रत्येक व्यवहारावर 500 रुपये शुल्क आणि इतर कर भरावे लागणार आहेत. याचा मोठा फटका पैसै पाठवणाऱ्यांना बसणार आहे.  


स्टेट बँक ऑफ इंडिया


परदेशात पैसे पाठवण्याचे शुल्क हे वेगवेगळ्या देशांच्या चलनावर अवलंबून असते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टे बँक ऑफ इंडियाने देखील त्यांच्या शुल्कात वाढ केलीय. दरम्यान, हे शुल्क पैसे पाठवणाऱ्यांना नाही तर पैसे मिळवणाऱ्यांना भरावं लागणार आहे. SBI चे शुल्क हे चलन रुपांतरण दराशी जोडलेले आहे. तुम्हाला जर एखाद्याला 1000 डॉलर्सची रक्कम पाठवायची आहे आणि SBI चे कमिशन 10 डॉलर आहे. परदेशात मनी ट्रान्सफरची सुविधा देणारी बँक देखील 1 डॉलर आकारते. तर ज्या व्यक्तीला पैसे मिळवायचे आहेत त्याला 1000 डॉलर्सऐवजी फक्त 989 डॉलर्स मिळतील. तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून शुल्क कट केले जाते.  SBI यूएस डॉलरसाठी 10 रुपये, ब्रिटिश पाउंडसाठी 8 रुपये, युरोसाठी 10 रुपये, कॅनेडियन डॉलरसाठी 10 रुपये आणि सिंगापूर डॉलरसाठी 10 रुपये आकारते.


ॲक्सिस बँक


ॲक्सिस बँकेने देखील परदेशात पैसे पाठवण्याच्या शुल्कात वाढ केलीय. तुम्ही एका दिवसात परदेशात 50,000 डॉलरपर्यंत पैसे पाठवले तर तुम्हाला एक रुपयाही देण्याची गरज नाही. एका दिवसात जास्त रक्कम पाठवायची असल्यास, तुम्हाला व्यवहाराच्या रकमेच्या 0.0004 टक्के कमिशन द्यावे लागेल.


महत्वाच्या बातम्या: