SBI Home Loan Rate Hike: देशातील सर्वात मोठ्या बँकेचं म्हणजेच, स्टेट बँक ऑफ इंडियाचं (State Bank of India) गृहकर्ज (Home Loan) आता महाग झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केल्यानंतर, जवळपास सर्वच बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. याच बँकांच्या यादीत आता एसबीआयचाही समावेश झाला आहे. गृहकर्जाच्या व्याजदरांत वाढ झाल्यामुळे तुमच्या गृहकर्जचा EMI (SBI Home Loan EMI) किती रुपयांनी वाढणार? ते जाणून घेऊया सविस्तर.
स्टेट बँक ऑफ इंडियानं 15 डिसेंबर 2022 पासून गृहकर्जाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे SBI कडून गृहकर्ज घेणं आता आणखी महागलं आहे. जर तुमचं होम लोन सुरू असेल आणि तुम्ही सध्या कर्जाचे हफ्ते भरत असाल, तर तुम्हालाही आजपासून पुढच्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेनं गृहकर्जाच्या व्याजदरात 0.35 टक्के वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत घर खरेदी करणाऱ्यांना महागड्या दरानं गृहकर्ज घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही पूर्वी 8.40 टक्के (सुरुवातीचा व्याजदर) दरानं 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज (SBI Home Loan) घेतलं असेल, तर आता तुम्हाला त्यावर अधिक ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे.
SBI कर्जाचा व्याजदर किती वाढला?
SBI च्या वेबसाईटनुसार, MCLR आधारित वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदर 8 टक्के ते 8.60 टक्के आहेत. पूर्वी ते 7.75 टक्के ते 8.35 टक्के होते. ऑटो, गृह आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या बँकेचे बहुतेक कर्ज व्याजदर यावर आधारित आहेत.
व्याज वाढल्यानंतर EMI कितीनं वाढणार?
जर सध्याच्या SBI ग्राहकानं एसबीआयकडून 8.40 टक्के व्याजदरानं 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर आता कर्जावरील वाढीनंतर, व्याज दर 8.75 टक्के (विशेष सवलती अंतर्गत 0.15 टक्के सवलतीसह) लागू झाला आहे. म्हणजेच, आता या नवीन दरांनुसार गृहकर्जाचे हफ्ते निश्चित केले जाणार आहेत. SBI होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, 30 लाख रुपयांच्या रकमेसाठी EMI 8.40 टक्के व्याज दरानं 25,845 रुपये झाले. आता नवीन दरांनुसार, ईएमआय 26511 रुपये होईल. म्हणजेच आता तुम्हाला दर महिन्याला 666 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. वार्षिक आधारावर जोडल्यास वर्षभरात एकूण 7992 रुपये अधिक भरावे लागतील.
SBI Home Loan चे व्याज दर
800 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्यांसाठी SBI च्या नवीन गृहकर्जावर (SBI Home Loan New Interest Rate) 15 डिसेंबर 2022 पासून सुरुवातीचा व्याजदर 8.90 टक्के आहे. गृह आणि घराशी संबंधित कर्जासाठी कमाल व्याजदर आता 11.05 टक्क्यांपर्यंत आहे. एकंदरीत, CIBIL स्कोअरनुसार व्याज ग्राहकांना भरावं लागणार आहे.
CIBIL स्कोअर चांगला असणाऱ्यांसाठी प्रास्ताविक दरात गृहकर्ज
तुमचा CIBIL स्कोर म्हणजेच, क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तरच तुम्हाला गृहकर्जाच्या (SBI Home Loan) सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज मिळते. CIBIL स्कोअर 300 ते 900 पॉइंट्स दरम्यान मोजला जातो. तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा CIBIL स्कोर किमान 750 च्यावर असेल, तर तुम्हाला कर्ज सहज मिळतं आणि बँका देखील सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज (SBI Home Loan) देतात. CIBIL सुधारण्यासाठी, तुम्हाला आर्थिक व्यवहार आणि पेमेंट नियंमांच्या अंतर्गत करावं लागतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
FD Rate Hike: SBI कडून ग्राहकांसाठी गुड न्यूज; FD वरील व्याजदरांत वाढ