Tax Saving Scheme: 2023-24 हे आर्थिक वर्ष (financial year) संपायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. पुढच्या 7 दिवसात हे आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळं 31 मार्चपूर्वी काही महत्वाची कामं तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहेत. यातीलच एक महत्वाचं काम म्हणजे आयकर बचत. तुम्हाला जर आयकर (Tax) वाचवायचा असेल तर कर बचत योजनेमध्ये (Yojana) (Tax Saving Scheme) गुंतवणूक करावी लागेल. याचा निर्णय तुम्हाला लवकरात लवकर घ्यावा लागेल. म्हणजे 31 मार्चच्या आत तुम्हाला यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल.


31 मार्च 2023 ला आर्थिक वर्ष संपणार आहे.  1 एप्रिलपासून नवीन 2024-25 हे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरम्यान, तुम्हाला जर आयकर वाचवायचा असेल तर 31 मार्चपूर्वी कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  31 मार्चनंतर सवलतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. गुंतवणूक करताना कोणत्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करावी हे बऱ्याच जणांना माहित नसते. तर त्यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. 


'या' कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता 


1) पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना


पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना ही बँकांमध्ये 'फिक्स डिपॉझिट' आणि पोस्ट ऑफिसमध्ये 'टाईम डिपॉझिट' म्हणून ओळखली जाते. तुम्ही या योजनेत किमान एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता. या योजनेते 5 वर्षासाठी गुंतवणूक करु शकता. यावर 1.50 लाख रुपयांची सूट मिळू शकते. यामध्ये तुम्हाला  7.50 टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. 


2) युलिप


ULIPS किंवा युनिट लिंक्ड विमा योजना तुम्हाला एकाच उत्पादनामध्ये दोन उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करतात. एक म्हणजे गुंतवणूक आणि विमा. हे दोन्ही तुम्हाला लाइफ कव्हर प्रदान करते. यामध्ये देखील तुम्हाला 1.50 लाख रुपयांची सूट मिळते. 


3) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) 


नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा NSC हा भारत सरकारने प्रोत्साहन दिलेला एक गुंतवणुकीचा मार्ग आहे. या योजनेचे व्यक्तींना दोन्ह प्रकारचे फायदे होतात. एक म्हणजे गुंतवणूक आणि दुसरे म्हणजे कर कपात. त्यामुळं तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकता. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अट नाही. तुम्ही 100, 1000 रुपयापासून गुंतवणूक करु शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला 1.50 लाखांची सुट मिळू शकते. सरकार यासाठी 7.70 टक्क्यांचा व्याजदर देते. 


4 ) इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज योजना


आयकर वाचवण्यासाठी आणखी एक गुंतवणूक योजना म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज योजना. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक फंडात गुंतवणूक करुन योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्ही तीन वर्षाच्या कालावधीतही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 1.50 लाख रुपयांची सूट मिळू शकते. 


महत्वाच्या बातम्या:


सावधान! 31 मार्च जवळ, उरले फक्त 10 दिवस, 'ही' 6 कामं पूर्ण करण्याची शेवटची संधी