मुंबई : सध्या देशात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नवनवे तरुण उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. तर वेगवेगळी अत्पादने घेत असलेल्या कंपन्या  आणखी पैसे गुंतवणूक आपल्या उद्योगाचा विस्तार करू पाहतायत. त्यासाठी आयपीओच्या (IPO) माध्यमातून निधी उभारला जातोय. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांनाही चांगला परतावा दिला आहे. दरम्यान, सध्या सनाथन टेक्स्टाईल (Sanathan Textiles IPO) या कंपनीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे. ही कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येत असून या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी चालून आली आहे. 


उभारणार 800 कोटी रुपये


सनाथन टेक्स्टाईल (Sanathan Textiles) ही कंपनी आपल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून भारतीय शेअर बाजारात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया म्हणून या कंपनीने नुकतेच भारतीय भांडवली बाजार नियामक मंडळाकडे (सेबी) त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी एकूण 800 कोटी रुपयांचे भांडवल उभे करू पाहात आहे. ही कंपनी आपल्या इक्विटी शेअर्सना बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करू इच्छीत आहे.


2022 मध्ये मसुद्याला मंजुरी


मिळालेल्या माहितीनुसार सनाथन टेक्स्टाईल कंपनीकडून आयपीओ आणण्यासाठी 2022 सालापासून प्रयत्न चालू आहेत. जानेवारी 2022 मध्ये या कंपनीने आयपीओचा मसुदा सेबीकडे पाठवला होता. त्यानंतर मे 2022 मध्ये सेबीने या मसुद्याला मंजुरी दिली होती. ही कंपनी सूत निर्मिती क्षेत्रात काम करते. गेल्या वर्षी 2023 मध्ये या कंपनीचा महसूल 3329.21 कोटी रुपये होता. या कंपनीला 2023 मध्ये 152.74 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 


इस्रायल-इराणमध्ये शेअर बाजारात अस्थिरता


 दरम्यान, गेल्या काही महिन्यांत भारतीय भांडवली बाजारात अनेक आयपीओ आले आहेत. यातील काही आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तर काही आयपीओंमध्ये गुंतवणूक केल्यामुळे काही लोकांना नुकसानीलाही तोंड द्यावे लागले आहे. दुसरीकडे सध्या भारतीय भांडवली बाजारात तणावपूर्ण स्थिती आहे. इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक भांडवली बाजारात अस्थितरता आहे. त्याचाच परिणाम सध्या भारतीय बाजारतही जाणवतो आहे. या आठवड्यात दोन इराण-इस्रायल यांच्यातील तणावामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स पडले होते. अनेक कंपन्यांना कोट्यवधींचा फटका बसला होता. या पडझडीत गुंतवणूकदारांचेही कोट्यवधी रुपये बुडाले. 


(फक्त माहिती देणे, हाच या लेखामागचा उद्देश आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)


हेही वाचा :


दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!


नारायण आजोबांनी भेट दिलेल्या शेअरची कमाल, 5 महिन्यांच्या नातवाच्या संपत्तीत तब्बल 4.2 कोटींची वाढ!


मंदिरात गेला अन् दान केले तब्बल 5 कोटी, मुकेश अंबानींच्या मुलाच्या दानशूरतेची चर्चा!