Salary Expenses : सामान्य माणसाच्या पगाराचा मोठा हिस्सा रेशन खरेदीवर खर्च होतो. पण तुम्हाला माहित आहे का की रेशननंतर त्यांचा बहुतांश पैसा हा वीज, पाणी, फोन आणि इंटरनेट बिल इत्यादींवर खर्च होतो. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 


सर्वसामान्य लोकांचा मोठा पैसा कर्जाच्या ईएमआयवर किंवा घराच्या भाड्यावर खर्च होत नाहीतर वीज आणि फोन बिलांवर खर्च होतो. याबाबतची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. सर्वसामान्यांच्या पगारातील सर्वाधिक पैसा रेशनवर खर्च होत असल्याचे 'पॉकेट सर्व्हे'मधून समोर आले आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींनी देशात महागाई कायम आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर दिसून येत आहे. तो त्याच्या पगारातील 19 टक्के पैसा एकट्या रेशनवर खर्च करतो.


हे बिल आहे की समस्या आहे?


रेशननंतर सामान्य माणसाच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग बिले भरण्यात खर्च होतो. यामध्ये वीज, फोन, पाणी, केबल आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश आहे. सामान्य माणूस त्याच्या मासिक उत्पन्नाच्या १२ टक्के पैसे हे फक्त बिले भरण्यासाठी खर्च करतो. यानंतर त्याचा सर्वात मोठा खर्च मुलांच्या फी भरण्यात होतो. हे त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 10 टक्के इतके आहे.


मासिक पगाराच्या 8 टक्के पैसे पेट्रोल, कपडे, औषधांवर खर्च 


खर्चाचा हा आकडा इथेच थांबत नाही. सामान्य माणूस त्याच्या मासिक पगाराच्या 8 टक्के पैसे पेट्रोल, कपडे, औषधे इत्यादींवर खर्च करतो.त्याच वेळी पगाराचा 3 टक्के पैसा घर भाड्यावर, 4 टक्के पैसा कर्ज भरण्यासाठी आणि 2 टक्के पैसा क्रेडिट कार्डवर खर्च केला जात आहे. इतर 8 टक्के खर्च केल्यानंतर, त्याच्याकडे फक्त 18 टक्के बचत उरते.


महत्त्वाच्या बातम्या:


सर्वाधिक पैसा कमावणारी देशातील 3  राज्ये कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर?