Uday Samant : राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार झाला असून एकूण 39 मंत्र्यांनी नागपुरात शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2024) पूर्वसंध्येला हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटात मंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी आमदाराकांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. असं कोणतंही प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेलं नाही असं यावेळी उदय सामंतांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये एकूण 12 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यातील अनेक मंत्री पुन्हा एकदा मंत्रीपदाचे दावेदार ठरलेत. त्यामुळे पक्षात बरंच नाराजीनाट्यही पाहायला मिळालं. पण आम्ही मंत्री म्हणून सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु असंही यावेळी उदय सामंत एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं आहे.
तर आम्ही दोन महिन्यांतही मंत्रीपद सोडू - उदय सामंत
आमदारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना उदय सामंतांनी म्हटलं की, अडीच अडीच वर्षांसाठीच्या फॉर्म्युल्याने थोडी नाराजी असू शकतो असं मला वाटतं. आम्हीही शिवसेनेत काम करताना कुटुंब म्हणूनच काम करतो, त्यामुळे थोडीफार जी नाराजी असेल ती मंत्री आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करु. राज्याचे शिवसेनेचे नेते अडीच वर्ष कशाला जर आम्ही कामं केली नाही आणि उद्या जर दोन महिन्यांनी त्यांनी सांगितलं की, मंत्री म्हणून थांबावं लागेल तरीही आम्ही थांबू. कारण फरफॉर्मन्स देणं, काम करणं ही आमची जबाबदारी आहे. जर आम्ही चांगलं काम करत नसू आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितलं तरी थांबलं पाहिजे तरी आम्ही थांबू, त्यासाठी प्रतिज्ञापत्राची गरज नाही.
आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा (oath taking ceremony) संपन्न झाला. यामध्ये तिन्ही पक्षाच्या 39 नेत्यांनी शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.