Richest Families in India : आपल्या देशातील अनेक कुटुंबाकांडे मोठी संपत्ती (wealth) आहे. प्रचंड संपत्ती असणाऱ्या कुटुंबांमध्ये अंबानी (Ambani), बजाज (Bajaj) आणि बिर्ला (Birla) कुटुंबांची गणना केली जाते. भारतात, 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असलेली सुमारे 124 कुटुंबे व्यवसाय जगतात राज्य करत आहेत. यापैकी अंबानी, बजाज आणि कुमार मंगलम बिर्ला कुटुंबाच्या व्यवसायाची एकूण संपत्ती 38.26 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा आकडा सिंगापूरच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. 


देशातील 10 सर्वात मोठ्या कौटुंबिक व्यवसायांचे एकूण मूल्य अंदाजे 60 लाख कोटी रुपये (715 अब्ज डॉलर) आहे. या यादीत केवळ अशाच व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे मूल्यांकन 2,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


अंबानी कुटुंबाचा व्यवसाय सर्वात मोठा 


हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस रिपोर्टनुसार, अंबानी, बजाज आणि कुमार मंगलम बिर्ला तीन कुटुंबांचे व्यावसायिक मूल्य देशात सर्वाधिक झाले आहे. अंबानी कुटुंबातर्फे चालवल्या जाणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 25.75 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, बजाज परिवाराच्या बजाज समूहाचा व्यवसाय अंदाजे 7.13 लाख कोटी रुपयांचा आहे. आदित्य बिर्ला समूहाचे मार्केट कॅप अंदाजे 5.39 लाख कोटी रुपये आहे.


सज्जन जिंदाल यांच्या कुटुंबाची संपत्ती 4.71 लाख कोटीवर 


सज्जन जिंदाल यांचे कुटुंब चौथ्या क्रमांकावरचे श्रीमंत आहे. त्यांची एकूण संपत्ती 4.71 लाख कोटी रुपये आहे. यानंतर 4.31 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह नाडर कुटुंबाचा क्रमांक येतो. महिंद्रा फॅमिली 3.45 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत 6 व्या क्रमांकावर आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांपैकी 28 कंपन्यांनी सर्वाधिक औद्योगिक उत्पादने तयार केली आहेत. यानंतर ऑटो क्षेत्रातील 23 आणि फार्मा क्षेत्रातील 22 कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, बहुतांश व्यवसाय दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीच्या लोकांच्या हातात आले आहेत. केवळ अदानी कुटुंबाच्या व्यवसायाचे नेतृत्व सध्या पहिल्या पिढीच्या हातात आहे. त्यांच्या व्यवसायाने 15.4 लाख कोटी रुपयांची संपत्ती मिळवली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चालवणाऱ्या पूनावाला कुटुंबाचे मूल्यांकन अंदाजे 2.37 लाख कोटी रुपये आहे.


मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर त्यांच्यापाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


जगातील सर्वात श्रीमंत लोकांना झटका, संपत्तीत झाली मोठी घट, मुकेश अंबानींसह अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना धक्का