Retirement Planning: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (investmen) महत्व वाढत आहे. गुंतवणूक करताना नागरिकांना दोन गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरं म्हणजे आपल्या ठेवीवर किती परतावा मिळतो? या गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला चांगला नफा मिळतो. दरम्यान, सेवानिवृत्ती (Retirement Planning) झाल्यानंतर व्यक्तीला निश्चित मासिक उत्पन्नाची व्यवस्था करावी लागते. निवृत्तीनंतर (Retirement) जर तुम्हाला 1 लाख रुपयांची पेन्शन हवी असेवं तर कुठे गुंतवणूक कराल? याबाबतची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
आजचे तरुण नोकरी सुरु करताच निवृत्तीचे नियोजन करु लागतात. त्यासाठी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे किंवा पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात. निवृत्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यात त्याला मदत होईल असे सर्व करण्याचा ते प्रयत्न करतात. सेवानिवृत्तीचे उद्दिष्ट म्हणजे व्यक्तीला निश्चित मासिक उत्पन्नाची व्यवस्था करावी लागते. जेणेकरुन निवृत्तीनंतरही त्याला निश्चित उत्पन्न मिळत राहील. मात्र, दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त निधी निर्माण करताना, हे शक्य होणार नाही या विचाराने अनेक तरुण चिंतेत पडतात. मात्र, महिना एक लाख रुपयांची पेन्शन मिळणे शक्य होणार आहे.
म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय
जर एखाद्या व्यक्तीचा मासिक खर्च 1 लाख ते 1.5 लाख रुपये असेल, तर 5 टक्के महागाई गृहीत धरल्यास, पुढील 25 वर्षांमध्ये त्याचा मासिक खर्च सुमारे 5.1 लाख रुपये असेल. अंदाजित उत्पन्नासाठी, तुम्ही तुमची ग्रॅच्युइटी आणि EPF रक्कम एचडीएफसी लाँग ड्युरेशन डेट फंड आणि निप्पॉन इंडिया लक्ष्य इन्व्हेस्टमेंट सारख्या दीर्घ कालावधीच्या डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकता. यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायची नसेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे.1 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासाठी, एखाद्या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी सुमारे 4 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे.
12,500 रुपयांची एसआयपी सुरु करा
दरम्यान, 25 वर्षांनी निवृत्त झाल्यावर तुम्हाला 4 कोटी रुपयांचा निधी हवा असणार आहे. तर तुम्हाला आजपासून 12,500 रुपयांची एसआयपी सुरु करावी लागेल. त्यानंतर 25 वर्षात हा 4.10 कोटी रुपयांचा निधी होईल. तुम्हाला सरासरी 15 टक्के मार्केट रिटर्ननुसार नफा मिळेल. मग कोणत्याही बँकेत एफडी करा, त्यानंतर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपयांची पेन्शन मिळेल.
महत्वाच्या बातम्या: