मुंबई: देशाच्या 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत असून त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी शेअर बाजारातही (Share Market) त्याचा उत्साह असल्याचं दिसून येतंय. देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी गुरूवारी संध्याकाळी मुबई शेअर बाजाराची इमारत (BSE) देशाच्या तिरंग्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात सजलेली पाहायला मिळणार आहे. 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण देशभरात उत्साह दिसून येतोय. त्या निमित्ताने मुंबईतील रस्ते, वाहने, अनेक संस्था यांवर तिरंगा आणि तिरंग्यांची सजावट सहज पाहायला मिळत आहे. 


बीएसईची आयकॉनिक इमारतही रंगात रंगणार


शेअर बाजाराच्या मुख्य इमारतींपैकी एक असलेल्या BSE ची आयकॉनिक इमारत देखील भगव्या, पांढर्‍या आणि हिरव्या रंगात सजलेली दिसेल. जसजशी संध्याकाळ जवळ येईल तसतशी बीएसईची इमारत देशाच्या प्रजासत्ताकाच्या रंगात उजळून निघेल. सर्व छायाचित्रकारांना, माध्यमांना ही नवीन रंगात सजलेली BSE बिल्डिंग पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.


शेअर बाजार आणि कमोडिटी-चलन बाजार बंद 


26 जानेवारी रोजी शेअर बाजाराला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीएसई आणि एनएसईमध्ये व्यवहार बंद राहतील. कमोडिटी बाजारात सुट्टी राहणार असून चलन बाजारही बंद राहणार आहे. अशा प्रकारे शेअर बाजारातील हा आणखी एक लाँग वीकेंड ठरला आहे. यानंतर शुक्रवारी प्रजासत्ताक दिन असून शनिवार आणि रविवारी जागतिक शेअर बाजारांप्रमाणे भारतीय शेअर बाजार बंद राहतात.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार 


आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी त्या संपूर्ण देशाला संबोधित करतील आणि भारतीय प्रजासत्ताकाला प्रजासत्ताकची 74 वर्षे कशी झाली याचा लेखाजोखा मांडतील. प्रजासत्ताक म्हणून भारत कसा असेल याचेही आकलनही वर्षे देऊ शकतात.


दिवाळीतही बीएसईची इमारत दिव्यांनी उजळून निघते


गेल्या वर्षी झालेल्या दिवाळीनिमित्त बीएसईची इमारतही दिव्यांनी उजळून निघाली होती. त्यावेळी ही इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी सजली होती. यावेळीही त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. 


ही बातमी वाचा :