Reliance Industries Share Price मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायाला मिळतेय. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधून येत्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं हा अंदाज वर्तवला असून गुंतवणूकदार रिलायन्समध्ये गुंतवणूक करतात का ते पाहावं लागेल.  


सीएलएसएनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, रिलायन्सच्या 40 अब्ज डॉलर्सच्या नवीकरणीय ऊर्जा व्यवसायाकडे बाजाराकडून दुर्लक्ष केलं जात आहे. देशांतर्गत बाजारात चांगली मागणी असल्यानं निर्यातीचं वातावरण असल्यानं भारतीय सोलर उत्पादकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


रिलायन्स इंडस्ट्रीजकडून इंटीग्रेटेड 20 गीगावॅट क्षमतेची सोलर गीगा फॅक्टरी पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये लाँच केली जाऊ शकते. सीएलएसएनं रिलायन्स इंडस्ट्रीजच्य्या सोलर बिझनेसचं मूल्यांकन 30 अब्ज डॉलर केलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं गेल्या काही काळात भारतीय शेअर बाजारात लिस्ट झालेल्या सोलार कंपन्यांच्या डिस्काऊंटवर  आधारित अंदाज वर्तवला आहे.  


रिलायन्सच्या शेअरमध्ये 70 टक्के तेजीचा अंदाज


सीएलएसएच्या अंदाजानुसार 2025 मध्ये अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे.  2025 मध्ये रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात वाढ होऊ शकते, रिटेल कारभारात पुन्हा तेजी दिसेल, एअर फायबर सबसक्राइबर्स संख्या वाढू शकते. रिलायन्स जिओचा आयपीओ येणार आहे. सीएलएसएनं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकचं आउटरपरफॉर्म रेटींग कायम ठेवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचं टारगेट प्राईस  1650 रुपये असू शकते असा अंदाज सीएलएसएनं वर्तवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आता 1250 रुपयांच्या दरम्यान असून त्यापेक्षा 30 टक्के अधिक टारगेट प्राईस वर्तवण्यात आली आहे.  सीएलएएसच्या रिपोर्टनुसार ब्लू-स्काई सिनॅरिओनुसार स्टॉकमध्ये सध्यापेक्षा 70 टक्के तेजी पाहायला मिळू शकते.  



दरम्यान, आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजाराचं सत्र संपलं तेव्हा 1251 रुपयांवर होता. आज देखील रिलायन्स च्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. 


इतर बातम्या : 



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)