Kantara: एखादी कथा सिनेमात जिवंत करायचे असेल तर सिनेमाच्या निर्मात्यांना त्या कथेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एखाद्या छोट्याशा जागेत उभ्या करत एक जिवंत जागा तयार करावी लागते. 2022 मध्ये रिलीज झालेल्या कांतारा या सिनेमानं जगभरात सगळ्यांचं प्रेम आणि कौतुक मिळवलं. या चित्रपटाने 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभूतपूर्व विजय मिळवला. मनोरंजन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. आणि भारताच्या मध्यभागी असलेली एक विलक्षण कथा आणली. या कथेने देशाच्चा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची जगाला ओळख करून दिली. पण या सिनेमात दाखवण्यात आलेला भव्य दिव्य कदंब साम्राज्य सेटवर कसं उभारलं माहितीये?
मोठ्या पडद्यावर कदंब साम्राज्य उभे ठाकणार
कांतारा 1 हा एक अद्भुत अनुभव असल्याचे या सिनेमाचे निर्माते सांगतात. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते आणि त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे.
80 फूट उंचीचा भव्य सेटही पुरेना
निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून अगदी चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी 80 फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना हवे ते साध्य होईना. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला.
कदंब साम्राज्याचे सौंदर्य प्रेक्षकांना खीळवणार !
कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जातो. कांतारा 1 या काळात सेट केला आहे. प्रीक्वल मधून चित्रपटाच्या विविध बाजू दिसणार आहेत. निर्माते या युगाची पुनर्निर्मिती करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसून ते हा चित्रपट साकारण्यासाठी अनेक आव्हान स्वीकारत आहेत. त्यामुळे कांतारा पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही.
कांतारा 2 चित्रपटाबाबत मोठी अपडेट
कांतारा चित्रपटाच्या पुढील भागासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी त्यांच्या टीमसोबत गेल्या एक वर्षापासून वेगाने काम करत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा 2' चित्रपटाचं अर्धे शूटिंग पूर्ण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. 'कांतारा 2' चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. रिपोर्ट्सनुसार दावा करण्यात येत आहे की, चित्रपटाचं आउटडोअर शूटींग पूर्ण झालं आहे, आता फक्त 15 ते 20 दिवसांचं इनडोअर शूटिंग बाकी आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू झालं असल्याचीही माहिती समोर येत आहे.