Ram Shinde : भाजपाचे कर्जत जामखेडचे उमेदवार विधानपरिषद आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर सोशल मीडियावर शिंदे यांना चांगलेच ट्रोल केलं जात आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार रोहित पवारांनी देखील शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने शिंदे यांना मोठा निधी दिलेला आहे, एवढेच नव्हे तर अर्ज दाखल करताना त्यांनी शपथपत्रावर 8 ते 10 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. असं असतांना हे आवाहन करणं म्हणजे हास्यास्पद असल्याचं रोहित पवारांनी म्हंटले आहे.
दरम्यान, लोकांना भावनिक करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असला तरी लोक त्यांच्यावर हसत आहेत. त्यांनी आता नेत्यांना विकत घेणे, दारु वाटणे सुरु केलेले असतांना हे आवाहन हास्यस्पद असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. कर्ज ज जामखेड विधानसबा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार आमदार रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना पुन्हा रंगला आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारांची मने वळवण्यासाठी भावनिक आवाहन देखील केलं जातं आहे.
हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली नसल्यानं संजय राऊत सभेला गैरहजर, राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
कर्जत - जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जामखेड येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली नसल्याने ते सभेला येऊ शकले नाहीत, त्यावरुन रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधत हेलिकॉप्टरला मुद्दामहून परवानगी देण्यात आली नाही असा आरोप केला. त्यावर भाजप नेते राम शिंदे यांनी प्रत्युत्तर देत कुणीही त्यांची परवानगी नाकारली नाही. संजय राऊत यांनाच कळून चुकलं असावं की रोहित पवारांच्या सभेला जाण्यात काही अर्थ नाही असा टोला राम शिंदे यांनी लगावला. सभेदरम्यान रोहित पवारांचे मुख्य भाषण होतं, परंतु त्यांच्या भाषणाच्या वेळीच लोक उठून जायला लागली. ही त्यांची पाच वर्षाची लोकप्रियता आहे असा चिमटा देखील राम शिंदे यांनी काढला.
राम शिंदे यांची विरोधकांवर सडकून टीका
दरम्यान, नि. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाशी बोलताना अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावर बोलताना राम शिंदे म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री आणि सचिन वाझे यांनी त्यावेळचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत बोलताना राम शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस असे नेते होते की त्यांच्या नेतृत्वाखाली दोनदा सरकार आले त्यांची भीती विरोधकांना वाटतं असावी म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असावा असं राम शिंदे म्हणाले. मात्र विरोधकांचे माप भरलेलं होतं म्हणून विरोधकांचे पक्षही फुटले आणि त्यांची चिन्हही गेली. त्यामुळं नियती कुणाला माफ करत नाही असा टोला राम शिंदे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
राम शिंदे, पवारांना चॅलेंज करु नका, रोहित संतापले; म्हणाले, भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय होणार