मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजने 2021-22 सालच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या काळात कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 18,589 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्सच्या या अहवालाकडे अवघ्या उद्योग जगताचे लक्ष लागून राहिले होते. महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स जिओ आणि रिटेल या दोन्ही कंपन्या या तिमाहीत नफ्यात आहेत. 


रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल वाढून तो 1 लाख 91 हजार 271 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 1 लाख 23 हजार 997 इतकी होती. रिलायन्सचा या तिमाहीचा नफा हा 15 हजारांच्या जवळपास असेल अशी शक्यता मार्केटमध्ये वर्तवण्यात येत होती. पण प्रत्यक्षात तो 18, 589 कोटी रुपये इतका झाला आहे. 


रिलायन्स जिओचा नफा
या तिमाहीतील रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा (Reliance Jio Infocomm)  निव्वळ नफा हा 3,615 कोटी रुपये इतका आहे. गेल्या तिमाहीचा विचार करता या नफ्यात 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रकाशित केल्यानंतर चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्सच्या या तिमाहीतील कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. आमच्या दोन्हीही कन्जुमर बिझनेस रिटेल आणि डिजिटल सर्व्हिसच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे. या पुढेही ही वाढ अशीच कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha