मुंबई : भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये रिलायन्सचे प्रमुख आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेअर होल्डर्सना संबोधित करणार आहेत. या दरम्यान मुकेश अंबानी आपल्या ऑईल टू केमिकल (O2C) कंपनीचा व्यवहार, स्वस्त 5G फोन, कंज्युमर फेसिंग रिटेल आणि इतर काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्सच्या या बैठकीकडे उद्योग जगतासोबतच सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. 


आज दुपारी दोन वाजता रिलायन्सची ही व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिलायन्सच्या ऑईल-टू-केमिकल (O2C) आणि सौदी अरबची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामको (Saudi Aramco) यांच्या दरम्यान 15 अब्ज रुपयांच्या व्यवहाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यामध्ये रिलायन्सच्या ऑईल टू केमिकलच्या 20 टक्के भागिदारी विक्रीसंबंधी बोलणी सुरु आहे. पण गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यामध्ये फारशी काही प्रगती झाली नव्हती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना या व्यवहाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.  


5G फोन लॉन्च होण्याची शक्यता
रिलायन्सने आपला पहिला  5G फोन Google आणि JioBook सोबत मिळून लॉन्च करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यावर अनेक गुंतवणूकदारांची नजर आहे. गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी तशी घोषणा केली होती. आजच्या बैठकीत रिलायन्सने आपला पहिला  5G फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. 


रिटेल आरआयएल साठी महत्वाची घोषणा होणार? 
रिलायन्सचे  JioMart सध्या देशातील दोनशेहून जास्त शहरात सुरु आहे. त्याच्याविषयी महत्वाची घोषणा आजच्या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच AJIO या रिलायन्सच्या फॅशन आणि लाईफस्टाईल प्लॅटफॉर्मविषयी काही महत्वपूर्ण घोषणा होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :