Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) झपाट्यानं वाढ होत आहे. या वाढीमुळं देशांतर्गत बाजारात सोन्याने नवीन ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याने प्रथमच 800 रुपयांच्या वाढीसह 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठली आहे. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 64,200 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर बंद झाला होता. आता त्यामध्ये 800 रुपयांची भर पडली आहे.
सोन्याचे दर नव्या ऐतिहासिक उच्चांकीवर पोहोचले आहेत. दरात 800 रुपयांच्या वाढीसह सोन्याचा दर हा 65000 रुपयांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा दर सरासरी 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो दर 65 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. मागील सत्राच्या तुलनेत 800 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 900 रुपयांच्या वाढीसह चांदी 74,900 रुपये किलोवर पोहोचली आहे. गेल्या सत्रात ही चांदी 74,000 रुपये प्रति किलोवर होती.
व्याजदरात कपात केल्यामुळं सोन्याच्या दरात झाली वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स कमोडिटी मार्केटमध्ये सोने प्रति औंस 2,110 डॉलरच्या वर व्यवहार करत आहे. जे मागील ट्रेडिंग सत्रापेक्षा एक टक्का अधिक आहे. अमेरिकेची सेंट्रल बँक येत्या काही दिवसांत व्याजदरात कपात करु शकते, अशी शक्यता वर्तवली जातेय. याआधी मार्च महिन्यातच कपातीचे संकेत मिळत होते. मात्र, आता जून महिन्यात यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याचा अंदाज आल्याने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये एमसीएक्समध्ये सोन्याचे भाव 2,400 रुपयांनी वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.51 टक्क्यांनी किंवा 329 रुपयांच्या वाढीसह 64,791 रुपयांवर बंद झाला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत परिणाम
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा दर सरासरी 62000 रुपयांच्या आसपास होता. मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव अचानक वाढले, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे.
सोने हे केवळ गुंतवणूकीचे साधन नाही. भारतातही लोक वापरासाठी सोने खरेदी करतात. त्यामुळे ते केवळ गुंतवणुकीच्या मागणीने चालत नाही तर मुख्य प्रवाहात सोन्याची मागणीही आहे. म्हणून, हे दुर्मिळ चांगले द्रव आहे. शिवाय, कोणीही त्यांच्या सोन्याच्या गुंतवणुकीला जगात कुठेही सहज सोडवू शकतो. तसेच, सोन्याचे मूल्य नेहमीच असते आणि ते कधीही शून्यावर जात नाही.
महत्वाच्या बातम्या: