RBI Action News : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील दोन महत्वाच्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बँकांच्या आर्थिक स्थितीमुळं RBI ने कारवाई केलीय. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, RBI ने मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक (Sarvodaya co op bank) आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या (National Urban Co-operative Bank Ltd) विरोधात कारवाई केलीय. या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ग्राहकांना किती रक्कम काढता येणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर मोठी कारवाई केलीय. या बँकांवर आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात निर्बंध घातले आहेत. एखाद्या बँकेनं जर नियमांचं उल्लंघन केलं तर त्यामुळं कारवाई करण्यात येते. दरम्यान, या दोन्ही बँकांवर आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका बँकेच्या खातेधारकांना खात्यातून केवळ 15 हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेच्या खातेधारकांना 10 हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांना काढता येणार नाही.
RBI नेमकी का केली कारवाई
दरम्यान, सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर RBI ने नेमकी का कारवाई केली? असा प्रश्न सर्वानांच पडला असेल. तर दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. या स्थितीमुळं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय.
नुकतीच शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर देखील कारवाई
दरम्यान, याआधी RBI ने महाराष्ट्रातील काही बँकांवर देखील कारवाई केली होती. नुकतीच आरबीआयने शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Shirpur Merchants Co-operative Bank) बंदी घातली होती. या बँकेवर देखील पैसे काढण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. या बँकेवर देखील आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळेच कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एखादी बँक डबघाईला आल्यास आणि आरबीआयनं त्या बँकेवर बंदी घातल्यास, ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यानुसार, बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराला 5 लाखा रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण असते. ज्यामध्ये त्या विशिष्ट बँकेतील त्यांच्या खात्यातील मुद्दल आणि व्याज समाविष्ट असते.
महत्वाची बातम्या
RBI Ban Bank : रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील मोठ्या बँकेवर बंदी; ग्राहकांना पैसे काढण्यासही निर्बंध