RBI Monetary Policy Impact On Your Budget: रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 मधील आपले पहिले पतधोरण जाहीर केले. सलग 11 व्यांदा रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाची घोषणा करताना रेपो दर कायम ठेवला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याज दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ही शक्यता ही मावळली आहे.
सध्या तरी कर्ज स्वस्त
विकासकांकडून घरांच्या किंमतीत वाढ होत असली, ऑटोमोबाइल कंपन्यांकडून कारच्या किंमतीत वाढ होत असली तरी व्याज दरात बदल होणार नसल्याचे कर्जावर त्यांचा परिणाम होणार नाही. गृह कर्ज, ऑटो कर्ज अथवा शैक्षणिक कर्ज सध्या तरी महाग होणार नाही.
वाढत्या महागाईने चिंता
आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना वर्ष 2022-23 मध्ये 5.7 टक्के इतका महागाई दर राहण्याचा अंदाज वर्तवला. सन 2021-22 मध्ये हा दर 4.5 टक्के इतका होता. सध्या किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या अंदाजापेक्षा अधिक 6 टक्के इतका आहे. कमोडिटीतील महागाईमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्ज महागणार
महागाईवर लगाम लावणे ही आरबीआयची प्राथमिकता असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. याचा अर्थ स्पष्ट असून वाढत्या महागाईच्या दृष्टीने आरबीआय येत्या काही दिवसात कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आता आरबीआयकडून पुढील पतधोरण जाहीर होईल तेव्हा व्याज दरात बदल होण्याची शक्यता असून कर्ज आणखी महाग होऊ शकतात. बँकांकडून सातत्याने डिपॉझिटवर व्याज दर वाढवले जात असून कर्जावरील व्याज दर स्थिर आहेत. बचतीवर व्याज दर वाढणे म्हणजे कर्जांवरील व्याज दरदेखील आगामी काळात वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जाते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: