RBI Monitoring Policy: रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.


अदृष्य शत्रू असलेल्या कोव्हिडच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपण आता चांगले तयार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत जीडीपी हा 13.7 टक्क्यांनी वाढला आहे. महागाई दरदेखील चार टक्क्यांच्या आसपास राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. मागील 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता. आता या धक्क्यातून आपली अर्थव्यवस्था चांगलीच सावरली असल्याचे त्यांनी नमूद केले.


ग्राहकांना काय फायदा?


आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवल्याने सध्या वर्षाला ६.५० टक्क्यांपर्यंत असलेले गृह कर्जाचे व्याज दर कायम राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त कर्जे मिळवण्यासाठी ग्राहकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.  


 





रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha