नवी दिल्ली भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज मोठी कारवाई केली. आरबीआयने बजाज फायनान्सवर (Bajaj Finance) दंडात्मक कारवाई केली आहे. पुण्यातील बजाज फायनान्स लिमिटेडवर आरबीआयने 8.50 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करून, RBI ने बजाज फायनान्स लिमिटेडवर 'रिझर्व्ह बँक मार्गदर्शक तत्त्वे 2016 अंतर्गत NBFCs मधील फसवणूक देखरेखीच्या मुद्याकडे दुर्लक्ष केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय, आरबीआयने आरबीएल आणि युनियन बँक ऑफ इंडियावरदेखील दंडात्मक कारवाई केली आहे. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अंतर्गत कलम 58G च्या उप-कलम 1 च्या कलम (b) अंतर्गत, RBI ला आर्थिक दंड आकारण्याचा अधिकार आहे. हा आर्थिक दंड नियमांचे पालन न केल्याने करण्यात आला आहे. कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर ही कारवाई केली नाही.  हा आदेश 28 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला होता. 


आरबीएल बँकवरही आरबीआयची कारवाई


28 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आणखी एका आदेशात, रिझर्व्ह बँकेने RBL बँक लिमिटेडवर 64 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे खाजगी क्षेत्रातील या बँकेवर हा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. 2015 मध्ये खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सच्या अधिग्रहणाशी संबंधित आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि मतदानाच्या अधिकारांची पूर्व मान्यता मिळाल्यामुळे RBL बँकेवर हा आर्थिक दंड ठोठावला आहे.


बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 च्या कलम 46 (4) (i) सह वाचलेल्या कलम 47A (1) (c) च्या तरतुदींनुसार RBI मध्ये निहित अधिकारांचा वापर करताना हा दंड लावण्यात आला आहे.


युनियन बँकही कारवाईच्या कचाट्यात


आरबीआयने 3 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, युनियन बँक ऑफ इंडियावर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. कर्जा बाबतच्या नियमांचे पालन न केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि 51(1) सह वाचलेल्या कलम 47A (1) (c) च्या तरतुदींनुसार RBI ला असलेल्या अधिकारनुसार, ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 


Paytm Payments बँकेवर कारवाई 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (Paytm Payments Bank) नो युवर कस्टमर (Know Your Customer) निकषांसह काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :