Rs. 2000 Currency Note: केंद्र सरकारने केलेल्या नोटा बंदीनंतर आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, मागील काही वर्षांपासून  या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून कमी होत असल्याचे म्हटले जात आहे. मार्च अखेरीस दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून 1.6 टक्के इतकाच राहिला आहे. सध्या जवळपास 214 कोटी नोटांचा वापर सुरू आहे. या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व मूल्याच्या नोटांची एकूण संख्या 13,053 कोटी इतकी होती. त्याआधी एक वर्षाच्या आधी हा आकडा 12,437 कोटी इतका होता. 


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च 2020 च्या अखेरीस चलनातील व्यवहारात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 274 कोटी इतकी होती. हा आकडा चलनात असलेल्या एकूण नोटांच्या संख्येच्या अनुषंगाने 2.4 कोटी इतका होता. त्यानंतर मार्च 2021 अखेरीस 2000 रुपयांच्या नोटांची संख्या घटून 245 कोटी रुपये किंवा दोन टक्के इतकाच राहिला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात हा आकडा 214 कोटी रुपये म्हणजे जवळपास 1.6 टक्के राहिला.


मार्च 2020 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य हे सर्व मूल्यांच्या नोटांच्या तुलनेत 22.6 टक्के होते. त्यानंतर मार्च 2021 अखेरीस हा आकडा कमी होऊन 17.30 टक्के आणि मार्च 2022 मध्ये 13.8 टक्के इतका झाला. आरबीआयच्या अहवालानुसार, या आर्थिक वर्षाच्या मार्च महिन्याच्या अखेरीस 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढून 4,554.68  कोटी इतकी झाली. एक वर्षाच्या आधी ही संख्या 3,867.90  कोटी इतकी होती. 


चलनात 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 34.9 टक्के होते. त्यानंतर 21.3 टक्के 10 रुपयांच्या नोटा होत्या. या अहवालानुसार, सर्व मूल्याच्या चलनात एकूण मूल्य या वर्षी 31.05 लाख कोटी रुपये झाले. तर, मार्च 2021 मध्ये याचे मूल्य 28.27 लाख कोटी रुपये होते.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: