मुंबई : बहीण-भावाच्या पवित्र रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. राखी बांधण्यासाठी गावी येणाऱ्या बहिणीला काहीतरी गिफ्ट देण्यासाठी भावांकडूनही डोकं खाजवलं जात आहे. साडी घ्यावी की, ड्रेस, नवं काहीतरी घ्यावं की स्मार्टफोन देऊन स्मार्ट भाऊ बनावं, अशा कल्पनांनी भावांच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू आहे. आपल्या लाडक्या बहि‍णींसाठी बजेटलमधील प्रिमियम स्मार्टफोन देऊन तुम्ही देखील राज्य सरकारप्रमाणे लाडक्या बहि‍णींना खुश करु शकता. ओप्पोचा बजेटमधील हा स्मार्टफोन तितकाच खास आणि बहि‍णींना ओवाळणी म्हणून नक्कीच आवडेल, असाच आहे. 

  
ओप्पोने के सिरीजमध्ये नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. K12x या नावाने हा 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून अनेक भन्नाट फीचर्स ग्राहकाला या फोनसोबत मिळणार आहेत. IP 54 रेटिंगसह हा फोन 29 जुलै रोजी भारतात लाँच झाला आहे. BREEZ BLUE आणि MIDNIGHT VOILET चाही समावेश आहे. नेहमीप्रमाणे ओप्पो सिरीजच्या लाईट वेट मोबाईलप्रमाणे हाही स्मार्टफोन वजनाने अतिशय हलका असून सहज वापरता येणारा आहे.


या स्मार्टफोनमध्ये स्प्लॅश टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. त्यामुळे, तुम्ही हात ओला असल्यानंतरही हा फोन वापरु शकता. ओप्पोचा हा स्मार्टफोन हँडल टू इजी विथ प्रिमियम म्हणता येईल. Oppo K12x 5G मध्ये 360 डिग्री डॅमेज प्रूफ आर्मर बॉडी वापरली आहे. याच्या डिझाइनमध्ये ड्रॉप रेसिस्टेंट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. याचा डिस्प्ले देखील पांडा ग्लासचा असून तो अतिशय सुरेख दिसत आहे, जो वापरकर्त्यांना चांगला पर्याय ठरू शकतो. 


ओप्पोच्या स्मार्टफोनचे फिचर


या स्मार्टफोनचं वजन केवळ 186 ग्रॅम असून हा स्मार्टफोन एकदम स्लीम आहे. 6 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि प्रीमियम लुकमुळे हा फोन तुम्हालाही रीच आत्मविश्वास देतो. 32 मेगा पिक्सेल रेअर कॅमेरा आणि 8 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा मस्त क्वालिटी आहे. ओप्पोच्या फोनमध्ये 6.67 इंच HD+ डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. त्यामुळे, प्रवासात देखील सहज वापर करता येईल. ग्राहकांना 12,999 रुपयांना हा 5जी स्मार्टफोन विकत घेता येईल. त्यामुळे, आपल्या लाडक्या बहिणींना स्मार्ट गिफ्ट देण्याचा विचार करणाऱ्या भावांसाठी हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच, भावाकडून मिळालेली ही स्मार्ट ओवाळणी बहिणीलाही नक्कीच आवडेल. 


हेही वाचा


महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात, जाहीर पाठिंबा 


नितेश राणे गो बॅक.. हिंदू जनआक्रोश मोर्चात घुसले मराठा आंदोलक, 10 जण पोलिसांच्या ताब्यात