मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची कंपनी रेअर इंटरप्राइजेसने इंडियाबुल्स रियल इस्टेटमध्ये 50 लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. त्याबदल्यात इंडियाबुल्स कंपनीत त्यांना 1.1 टक्क्यांची भागीदारी मिळाली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून ही 1.1 टक्क्याची भागीदारी घेतली आहे. गुरुवारी शेअर मार्केटमध्ये इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या निर्देशांकात जवळपास 14 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 54.95 या किंमतीवर बंद झाला.
राकेश झुनझुनवाला यांची कंपनी रेअर इंटरप्रायजेसने 57.73 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने इंडियाबुल्स ग्रुपच्या मालकीच्या रिअल इस्टेट फर्ममध्ये 50 लाख इक्विटी शेअर्सची मालकी मिळवली. एनएसईच्या संकेतस्थळावर या व्यवहाराची माहिती मिळाली. रेअर इंटरप्रायजेसने खरेदी केलेल्या या शेअर्सची किंमत 28.86 कोटी रुपये इतकी आहे.
इंडियाबुल्सच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी
आज इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या शेअर्सच्या किंमतीत 12 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. त्याची किंमत 61.70 रुपयांवर पोहोचली. काल या शेअर्सच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली होती. कालची किंमत ही 55.10 रुपये इतकी होती.
राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच Va Tech Wabag लिमिटेड आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सची खरेदी देखील केली होती. झुनझुनवाला यांनी Va Tech Wabag लिमिटेडच्या 50 लाख शेअर्सची खरेदी केली आणि कंपनीत त्यांची भागीदारी 8.04 इतकी वाढवली. सध्याच्या 184.35 रुपये या भावानुसार या शेअर्सची किंमत 92.2 कोटी रुपये इतकी झाली आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्सच्या 1.29 टक्के शेअर्सची खरेदी केली होती. त्यांनी या कंपनीचे 4 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे त्यांचा या कंपनीच्या प्रमुख माइनॉरिटी स्टेकहोल्डर्समध्ये समावेश झाला आहे. या शेअर्सच्या 151.20 रुपये इतक्या चालू किंमतीनुसार त्याचे एकूण मूल्य हे 605 कोटी रुपये इतके आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी NCC लिमिटेडमध्ये 0.69 टक्के, अॅग्रो टेक फूडमध्ये 2.87टक्के, जुबिलेंट लाईफ सायन्समध्ये 0.63 टक्के आणि ल्यूपिनमध्ये 0.06 टक्के भागीदारी मिळवली आहे. त्यांनी फेडरल बँकमध्ये 0.47 टक्के, एस्कॉर्टमध्ये 1.78 टक्के, ऑटोलाईन इंडस्ट्रीजमध्ये 0.28 टक्के आणि टायटन कंपनीमध्ये 0.01 टक्क्यांनी आपली भागीदारी कमी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: