Rakesh Jhunjhunwala Mumbai News : शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ट्रस्टची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न सुटला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) हे आता राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) ट्रस्टची कमान सांभाळणार आहेत. राधाकृष्ण दमानी हे राकेश झुनझुनवाला यांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि त्यांचे गुरू असल्याचं सांगितलं जातंय. राधाकृष्ण दमानी हे झुनझुनवाला ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी असतील, तसेच त्यांच्यासोबत कल्पराज धारांशी आणि अमर पारिख हे अन्य दोन सहकारी असतील. हे दोघेही राकेश झुनझुनवाला यांचे जवळचे मित्र आहेत. 


राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची पत्नी रेखा यादेखील गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावाने Rare Enterprises ही ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. राकेश झुनझुनवाला यांच्या रेअर एंटरप्राईजेस या कंपनीचे व्यवस्थापन त्यांचे दोन सहकारी उत्पल सेठ आणि अमित गोएला यांच्याकडे असेल. उत्पल सेठ हे राकेश झुनझुनवाला यांना गुंतवणुकीसाठी मदत करत होते. तसेच गेल्या काही वर्षांपासून ते प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करत आहेत. अमित गोएला यांची ट्रेडिंगच्या बाबतील त्यांचा उजवा हात अशी ओळख आहे. 


राकेश झुनझुनवाला 48 व्या क्रमांकांचे श्रीमंत



राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट (14th August) रोजी निधन झालं होतं. त्यांच्यामागे त्यांची पत्नी रेखा (Rekha Jhunjhunwala) आणि तीन मुलं असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला 5.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती मागे सोडून गेले. राकेश झुनझुनवाला हे देशातील 48 व्या क्रमाकाचे श्रीमंत व्यक्ती होते. सागर असोसिएट्सचे पूर्व मॅनेंजिंग पार्टनर बेर्जिस देसाई यांनी त्यांचे वारसाहक्क पत्र तयार केल्याची माहिती सांगितली जाते. 


राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते.


महत्त्वाच्या बातम्या: